Home / महाराष्ट्र / उद्या तिन्ही मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक घोषित

उद्या तिन्ही मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक घोषित

मुंबई- विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मुख्य व हार्बर (Harbour Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर...

By: Team Navakal
Megha Block

मुंबई- विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मुख्य व हार्बर (Harbour Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर अशा तिन्ही मार्गावर उद्या रविवार १५ जून रोजी मेगाब्लॉक (Mega block) घोषित करण्यात आला आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहार दम्यान Up आणि Down धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या काळात ब्लॉक असणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ या कालावधीत सुटणाऱ्या सर्व डाउन धीम्या लोकल ट्रेन सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबणार आहेत आणि विद्याविहारपासून पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि Down Slow मार्गावर सकाळी ११.५ ते दुपारी ४.५ या कालावधीत मेगाब्लॉक असणार आहे. पनवेलवरून सकाळी १.३३ ते दुपारी ३.४९ या कालावधीत CSMT हून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान
सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ५ तासांचा ब्लॉक असणार आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या