Home / महाराष्ट्र / नंदुरबार मधील बोरझर होणार आता ‘मधाचे गाव’

नंदुरबार मधील बोरझर होणार आता ‘मधाचे गाव’

नंदुरबार- प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचे गाव करण्यासाठी राज्य सरकारनकडून १७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर...

By: Team Navakal
Honey Village

नंदुरबार- प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचे गाव करण्यासाठी राज्य सरकारनकडून १७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बोरझर या गावाची ‘मधाचे गाव (Honey village)’ म्हणून निवड केली आहे. ही निवड प्रायोगिक तत्त्वावर केली असल्याची माहिती जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी व ‘मधाचे गाव’ समितीचे सचिव राजेश गवांदे यांनी दिली.


जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘मधाचे गाव’ अशी निवड झाल्यामुळे आता या बोरझर गावामध्ये एक समिती स्थापन केली जाणार आहे, तसेच या गावांकडे योजना पुढील वर्षभर सुरू ठेवण्याची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून हमीपत्र घेण्यात येणार आहे. मधाचे गाव योजना राबवण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निवडलेल्या गावांमध्ये मधमाशी पेट्या (Bee boxes) देणार त्यानंतर मधाची खरेदी मंडळाकडून करण्यात येणार आहे. त्यायाचसोबत गावांमध्ये मध माहिती केंद्र, मधसंकलन केंद्र देखील उभारणार आहेत. तसेच ‘मधाचे गाव ‘कमान तयार केली जाणार आहे. या योजनेत जनजागृती मेळावे घेणे, सातेरी, मेलीफेरा आणि आग्या मध युनिट प्रशिक्षणासाठी लाभार्थीकडून अर्ज घेणे व त्यांना प्रशिक्षण देणे. ९० % दरानुसार साहित्य वाटप करणे या कामांचा समावेश असणार आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या