Home / News / सीबीआयची देशभरात १० ठिकाणी छापेमारी

सीबीआयची देशभरात १० ठिकाणी छापेमारी

मुंबई – सायबर आर्थिक गुन्ह्यांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) देशभर मोहीम चालवली आहे. या ऑपरेशन चक्र अंतर्गत सीबीआयने (Central Bureau...

By: Team Navakal
Central Bureau of Investigation

मुंबई – सायबर आर्थिक गुन्ह्यांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) देशभर मोहीम चालवली आहे. या ऑपरेशन चक्र अंतर्गत सीबीआयने (Central Bureau of Investigation) आज देशभरात मोठी कारवाई करत १० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, दिल्ली, लखनऊ आणि हरियाणातील हिस्सार येथील ठिकाणांचा समावेश आहे.

ही कारवाई करत असताना कल्याण (Kalyan)येथील एका व्यक्तीलाही अटक केली आहे. प्राथमिक तपासात तो सायबर फसवणूक प्रकरणात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी सायबर फसवणूक (cyber fraud) करणाऱ्यांना बेकायदा सिमकार्ड व बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाती उघडून देत होता असा आरोप आहे. या बँक खात्यांत सायबर फसवणुकीची रक्कम जमा होत असल्याचे उघड झाले आहे.छाप्यादरम्यान आरोपीकडून महत्वाचे दस्तावेज आणि साहित्य जप्त करण्यात आले.

Web Title:
संबंधित बातम्या