Home / मनोरंजन / सनरायझर्स हैदराबादची मालकीण प्रसिद्ध गायकाबरोबर करणार लग्न? स्वतः अनिरुद्ध रविचंदर ट्विट करत म्हणाला…

सनरायझर्स हैदराबादची मालकीण प्रसिद्ध गायकाबरोबर करणार लग्न? स्वतः अनिरुद्ध रविचंदर ट्विट करत म्हणाला…

Anirudh Ravichander on Marriage Rumours | सनराइझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन (Kavya Maran) आयपीएलदरम्यान नेहमीच चर्चेत असते. मात्र, आता आयपीएल...

By: Team Navakal
Anirudh Ravichander on Marriage Rumours

Anirudh Ravichander on Marriage Rumours | सनराइझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन (Kavya Maran) आयपीएलदरम्यान नेहमीच चर्चेत असते. मात्र, आता आयपीएल 2025 संपल्यानंतरही काव्या सध्या चर्चेत आहे. ती लवकरच लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदरसोबत (Anirudh Ravichander) लग्न करणार असल्याची चर्चा गेल्याकाही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगली आहे.

काव्या आणि अनिरुद्ध मागील वर्षभरापासून एकमेकांना डेट करत असून, ते लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र, अखेर अनिरुद्धनेच या अफवांवर पूर्णविराम लावला आहे. अशाप्रकारच्या अफवा पसरवू नये, असे अखेर अनिरुद्धने सोशल मीडियावर म्हटले आहे.

शनिवारपासून रेड्डीटवर एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं. त्यात दावा करण्यात आला होता की, अनिरुद्ध आणि काव्या गेल्या वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि लवकरच लग्न करणार आहेत. काहींनी तर या दोघांना नुकतंच ‘डिनर डेट’वर पाहिल्याचं सांगितलं. एका पोस्टमध्ये असंही म्हटलं होतं की, सुपरस्टार रजनीकांत यांनी काव्याचे वडील आणि सन टीव्हीचे प्रमुख कलानिधी मारन यांच्याशी या नात्याबद्दल बोलणी केली आहेत.

सोशल मीडियावर या चर्चा सुरू झाल्यानंतर अखेर अनिरुद्धने ट्विट करत या अफवा असल्याचे म्हटले आहे.लग्न? शांत राहा मित्रांनो, कृपया अफवा पसरवणं थांबवा.”, असे म्हणत त्याने अफवांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

अनिरुद्ध आणि काव्या मारन कोण आहेत?

अनिरुद्ध हा दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार आहे. तो अभिनेते रवी राघवेंद्र आणि शास्त्रीय नृत्यांगना लक्ष्मी यांचा मुलगा असून, निर्माता के. सुब्रमण्यम यांचा नातू आहे. त्याची मावशी लता या रजनीकांत यांच्या पत्नी आहेत. अनिरुद्धने रजनीकांत, कमल हासन, विजय, अजित कुमार, सूर्या, पवन कल्याण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासाठी संगीत दिलं आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

दुसरीकडे, काव्या मारन या सन ग्रुपचे प्रमूख कलानिधी मारन यांची मुलगी आणि सनरायझर्स हैदराबादच्या सह-मालक आहेत. त्या आयपीएल सामन्यांमध्ये आपल्या संघाला प्रोत्साहन देताना नेहमी दिसतात, ज्यामुळे त्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या