Home / News / दोन दिवसांत कामे पूर्ण करा अन्यथा १० कोटींचा दंड भरा

दोन दिवसांत कामे पूर्ण करा अन्यथा १० कोटींचा दंड भरा

DCM Pawar warn TATA company पुणे- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम TATA टाटा कंपनी करत आहे. परंतु METRO मेट्रोच्या कामामुळे...

By: Team Navakal
Ajit Pawar Expresses Displeasure Over PWD Work
Social + WhatsApp CTA

DCM Pawar warn TATA company

पुणे- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम TATA टाटा कंपनी करत आहे. परंतु METRO मेट्रोच्या कामामुळे हिंजवडीतील अनेक रस्त्यांवर पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण होत आहे. Hinjwadi metro water याच परिसरात पालखी मार्ग आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत किंवा पालखी शहरात यायच्या आधी पालखी मार्गावरील सर्व प्रकारचे अडथळे दूर करावेत, अन्यथा या कंपनीला १० कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली जाईल, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. DCM Pawar warn TATA company
उपमुख्यमंत्री पवार यांनी पालखी सोहळयाच्या नियोजनासाठी नुकतीच एक आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलतान म्हणाले की, हिंजवडीत पाणी तुंबण्याच्या प्रकाराची माहिती पीएमआरडीए तसेच टाटा मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून घेतली आहे. याप्रकरणी मेट्रोने पाण्याला वाट करून देण्यासाठी तातडीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शनिवारी, रविवारी या रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने या दोन दिवसात काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सोमवारपर्यंत काम न केल्यास दहा कोटींचा दंड कंपनीला आकारला जाईल. कंपनीने काम करताना अशा गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. मात्र, दुर्लक्ष झाल्यास आर्थिक दंडाचा बडगा उगारावा लागेल. तसे झाले तर पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत.
वास्तविक, मेट्रोचे काम करताना पावसाळी नाले बुजविणे, पाण्याला वाट करून देण्यासाठी सुविधा नसणे यामुळे थोडया पावसात रस्त्यावर पाण्याची तळी साचत आहेत. याबाबीकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या