Home / News / एसटी हॉटेल थांब्याबाबत नवी आचारसंहिता जाहीर

एसटी हॉटेल थांब्याबाबत नवी आचारसंहिता जाहीर

New code of conduct announced regarding ST hotel stay मुंबई – एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत एसटी महामंडळ प्रशासनाने नवी आचारसंहिता...

By: Team Navakal
New code of conduct announced regarding ST hotel stays

New code of conduct announced regarding ST hotel stay

मुंबई – एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत एसटी महामंडळ प्रशासनाने नवी आचारसंहिता जाहीर केली आहे.ST hotel stay मागील काही दिवसांपासून थांब्यावरील विविध समस्या प्रवाशांनी उपस्थित केल्या होत्या. त्यानुसार परिपत्रक काढून अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे संबंधित हॉटेल थांब्याला मंजुरी दिली जाणार आहे. नवीन हॉटेल थांब्याला पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे मान्यता देत असताना ती ३ वर्षांसाठी दिली जाईल. परंतु १ वर्षानंतर संबंधित हॉटेल थांब्यावरील सेवा- सुविधेचा फेर आढावा घेऊन पुढील २ वर्षांच्या मुदतवाढीबाबत विचार केला जाणार आहे. या थांब्याची निवड करताना तेथील स्वच्छता, अन्नपदार्थ दर्जा आणि बसेसची पार्किंग व्यवस्थेचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. एसटी हॉटेल थांब्याची शिफारस करताना त्या क्षेत्रातील आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी व विभाग नियंत्रक यांनी प्रत्यक्ष भेटून पाहणी करणे अपेक्षित आहे. त्यांच्या अहवालाच्या आधारे संबंधित हॉटेल थांब्याला मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या हॉटेल थांब्या संदर्भात कोणतीही प्रवासी तक्रार उद्भवल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या