Home / देश-विदेश / पाकिस्तानने भारताचे राफेल विमान पाडले का? फायटर जेट बनवणाऱ्या कंपनीनेच उघड केला पाकचा खोटारडेपणा, दावा फेटाळला

पाकिस्तानने भारताचे राफेल विमान पाडले का? फायटर जेट बनवणाऱ्या कंपनीनेच उघड केला पाकचा खोटारडेपणा, दावा फेटाळला

Rafael Fighter Jet | पाकिस्तानने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताची तीन राफेल लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला होता. मात्र, राफेल बनवणाऱ्या...

By: Team Navakal
Rafael Fighter Jet

Rafael Fighter Jet | पाकिस्तानने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताची तीन राफेल लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला होता. मात्र, राफेल बनवणाऱ्या फ्रेंच कंपनी दसॉल्ट एव्हिएशनचे अध्यक्ष आणि सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी हा दावा ठामपणे फेटाळला आहे. फ्रेंच मासिक ‘चॅलेंजेस’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रॅपियर यांनी हा दावा फेटाळला.

ट्रॅपियर म्हणाले की, “भारताने राफेल विमाने गमावल्याचे वृत्त चुकीचे आहे. भारतीय हवाई दलाकडून अशा कोणत्याही नुकसानीची माहिती आम्हाला मिळालेली नाही.”

‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पाकिस्तानचे दावे

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी दावा केला होता की, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांना उत्तर म्हणून पाकिस्तानने तीन राफेलसह पाच भारतीय विमाने पाडली आणि भारतीय सैनिकांना पकडले. मात्र, या दाव्यांना समर्थन देणारा कोणताही पुरावा पाकिस्तानने अद्याप सादर केलेला नाही.

भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत गुप्तता राखली असून, कोणत्याही विमानाच्या नुकसानीची पुष्टी केलेली नाही.

एरिक ट्रॅपियर यांनी राफेलच्या क्षमतेबाबत माहिती देताना सांगितले म्हणाले, “राफेल हवाई लढाई, हेरगिरी, जमिनीवरील हल्ले, अणुबॉम्ब प्रतिबंध आणि विमानवाहू नौकेवर तैनाती यासाठी अतुलनीय आहे.” अमेरिकेच्या F-22 च्या ‘स्टेल्थ’ तंत्रज्ञानाची प्रशंसा करताना त्यांनी राफेल F-35 आणि चीनी विमानांपेक्षा सरस असल्याचे सांगितले. सोबतच, पाकिस्तान 3 राफेल विमाने पाडल्याचा करत असलेला दावा चुकीचा असल्याचेही ते म्हणाले.

2020 मध्ये भारतीय हवाई दलात सामील झाल्यापासून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही राफेलची पहिली मोठी युद्ध मोहीम होती. भारतीय संरक्षण तज्ञ राफेलला दक्षिण आशियातील हवाई शक्तीचा ‘गेम-चेंजर’ मानतात, ज्यामुळे भारताला प्रादेशिक शत्रूंवर आघाडी मिळाली आहे.

भारतीय हवाई दल आणि संरक्षण अधिकाऱ्यांचे वक्तव्य

हवाई दलाचे महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर पत्रकार परिषदेत सांगितले होते की, “युद्धात नुकसान होणे स्वाभाविक आहे, पण आमचे लक्ष्य दहशतवादी तळंनष्ट करण्याचे होते, आणि ते आम्ही साध्य केले आहे.” भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी सिंगापूरमधील शांग्री-ला डायलॉगमध्ये पाकिस्तानचे दावे “पूर्णपणे चुकीचे” असल्याचे म्हटले. त्यांनी काही विमानांचे नुकसान झाल्याची पुष्टी केली, पण राफेलचा समावेश होता की नाही, हे स्पष्ट केले नाही.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या