Home / देश-विदेश / Haifa Port | इस्रायल-इराण संघर्षात अदानींचे हाइफा बंदर सुरक्षित! क्षेपणास्त्र हल्ल्याचा परिणाम नाही, कामकाज सुरळीत

Haifa Port | इस्रायल-इराण संघर्षात अदानींचे हाइफा बंदर सुरक्षित! क्षेपणास्त्र हल्ल्याचा परिणाम नाही, कामकाज सुरळीत

Adani Haifa Port | इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर आता इराणने देखील प्रत्युत्तर देण्यात सुरू केले आहे. इराणने इस्त्रायलमधील हाइफा बंदर आणि...

By: Team Navakal
Haifa Port

Adani Haifa Port | इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर आता इराणने देखील प्रत्युत्तर देण्यात सुरू केले आहे. इराणने इस्त्रायलमधील हाइफा बंदर आणि जवळील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला लक्ष्य केले होते. हे बंदर भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाच्या अखत्यारीत आहे. मात्र, इराणच्या हल्ल्यात बंदराचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे समोर आले आहे.

इराणने हाइफा बंदर आणि जवळील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला लक्ष्य केले होते, परंतु अदानी समूहाने बंदरातील मालवाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत असल्याची पुष्टी केली आहे.

हल्ल्याचा बंदरावर परिणाम नाही

अनेक रिपोर्टमध्ये दावा करण्यता आला होता की इराणने केलेल्या हल्ल्यात हाइफा बंदराचे नुकसान झाले होते. मात्र, अदानी समूहाने ही माहिती खोटी असल्याचे म्हचले आहे.. अदानी समूहाचे ग्रुप सीएफओ जुगेशिंदर रॉबी सिंह यांनी सांगितले की, इराणच्या हल्ल्याचा हाइफा बंदरावर कोणताही परिणाम झाला नाही. बंदरातील केमिकल टर्मिनलवर काही धातूचे तुकडे पडले, तर काही क्षेपणास्त्रे तेल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ पडली. मात्र, या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही आणि बंदराचे कामकाज सामान्य आहे.

हाइफा बंदराचे महत्त्व

हाइफा बंदर इस्रायलच्या 30 टक्क्यांहून अधिक आयातीची हाताळणी करणारे एक महत्त्वाचे सागरी केंद्र आहे. अदानी पोर्ट्स अँड सेझ (APSEZ) यामध्ये 70 टक्के हिस्सा ठेवते आणि बंदरात कंटेनर, बल्क, ब्रेकबल्क, सिमेंट आणि सामान्य मालवाहतुकीचे कामकाज केले जाते. बंदरात सुमारे 700 कर्मचारी कार्यरत असून, ते इस्रायलच्या परिवहन मंत्रालयाशी समन्वय साधत सुरक्षा आणि इतर आवश्यकतांचे पालन करत आहे.

दरम्यान, इस्रायलने इराणच्या अणु, क्षेपणास्त्र आणि लष्करी पायाभूत सुविधांवर हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने हाइफा बंदर आणि तेल शुद्धीकरण प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ले केले. इराणने दावा केला की, इस्रायलने त्यांच्या दोन तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ला केला, ज्यामुळे त्यांच्या ऊर्जा उद्योगावर परिणाम होऊ शकतो.

हाइफा बंदर अदानी पोर्ट्सच्या एकूण मालवाहतुकीच्या 2 टक्क्यांपेक्षा कमी आणि महसुलाच्या 5 टक्के योगदान देते. तरीही, हे बंदर इस्रायलच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे. अदानी समूहाने या घटनेवर तात्काळ कोणतीही टिप्पणी केलेली नाही, परंतु बंदराचे कामकाज सुरळीत असल्याचे सांगितले आहे. शेजारील चीनी बंदरही सामान्यपणे कार्यरत आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या