Home / राजकीय / मावळ पूल दुर्घटनेला अजित पवार जबाबदार; संजय राऊतांचा आरोप

मावळ पूल दुर्घटनेला अजित पवार जबाबदार; संजय राऊतांचा आरोप

मुंबई – मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेला उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) आणि तत्कालीन मुख्यमंत्री (CM)...

By: Team Navakal
sanjay Raut


मुंबई – मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेला उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) आणि तत्कालीन मुख्यमंत्री (CM) जबाबदार आहेत,असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (UBT MP Sanjay Raut) यांनी आज केला.

या पुलाच्या बांधकामासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. रविंद्र चव्हाण यांनी ८० हजाराच्या मंजुरीच्या कागदपत्रावर सही केली . ते झोपेत सही करतात का ? हा निधी मंजूर होऊनही तो पैसा कुठे गेला? हे कळलेच नाही. अजित पवार हे गेली अनेक वर्षे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना पुण्याचे पालकमंत्री असल्याचा गर्व आणि अहंकार आहे. त्यांनी या पूल दुर्घटनेची जबाबदारी घेतली पाहिजे. सरकारच्या हलगर्जीपणामुळेच चार जणांचे हकनाक बळी गेले आणि काही जण अजुनही बेपत्ता आहेत. या जबाबदार अजित पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे,असे राऊत म्हणाले.


केंद्रातील आणि राज्यातील सरकार पनवती आहे. या सरकारच्या काळात अपघातांची आणि भ्रष्टाचारांची मालिकाच सुरू झाली आहे,असा टोलाही राऊत यांनी लगावला.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या