Home / क्रीडा / गौतम गंभीर आजपासून पुन्हा भारतीय संघाबरोबर

गौतम गंभीर आजपासून पुन्हा भारतीय संघाबरोबर

लंडन- भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर उद्यापासून पुन्हा इंग्लंड दौऱ्यात सहभागी होणार आहे. आईच्या आजारपणामुळे त्याला दौरा अर्धवट टाकून...

By: Team Navakal


लंडन- भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर उद्यापासून पुन्हा इंग्लंड दौऱ्यात सहभागी होणार आहे. आईच्या आजारपणामुळे त्याला दौरा अर्धवट टाकून तातडीने भारतात यावे लागले होते. आता त्याच्या आईची तब्येत चांगली असून तो भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी पुन्हा हाती घेणार आहे
भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून भारतीय संघाचा पहिला सामना २० जूनपासून सुरु होत आहे. गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर तिला दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गौतमही १२ जूनला भारतात परतला होता. गौतमच्या गैरहजेरीत भारतीय संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी सितांशु कोटक आदींनी घेतली होती. याच कालावधीत बेंकहम इथे भारतीय संघाचा एक सराव सामनाही झाला होता. भारतीय क्रिकेट संघामध्ये रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या निवृत्तीमुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली असून या दौऱ्यात भारतीय फलंदाजीची मदार इतर तरुण फलंदाज व कर्णधार शुभमन गिल यांच्यावर आहे. दरम्यान इंग्लंडमधील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांना साथ देईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या