Home / राजकीय / धीरूभाई अंबानी पेट्रोल सोडून कोट्यधीश झाले; अजित पवारांच्या विधानावरून वाद

धीरूभाई अंबानी पेट्रोल सोडून कोट्यधीश झाले; अजित पवारांच्या विधानावरून वाद

बारामती – धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) हे पेट्रोल (Petrol) सोडून कोट्यधीश झाले, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar)...

By: Team Navakal
Ajit Pawar and Dhirubhai Ambani

बारामती – धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) हे पेट्रोल (Petrol) सोडून कोट्यधीश झाले, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारावेळी केले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यातील ‘सोडून’ हा शब्द काहींना चोरून असा भासल्याने सोशल मीडियावर मोठा गदारोळ उडाला. त्यांचे हे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी एक्स पोस्ट करत पंपावर पेट्रोल चोरून अंबानी कोट्यधीश झाले आणि तुम्ही सिंचन घोटाळा, एमएसईबी घोटाळा करून काय केले असा सवाल विचारला. यावर अजित पवार गटाच्या सुरज चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले. मराठीमध्ये एक म्हण आहे ध चा मा करणे तसे इथे स्वयंघोषित समाजसेविकेने व्यक्तीद्वेषापोटी सोडूनला चोरून केले.

अजित पवार भाषणात म्हणाले की, , धीरूभाई अंबानी पेट्रोल सोडून कोट्यधीश झाले. मला सहकार टीकवायचे नसते, तर मी पेट्रोल पप काढले असते का? काही का होईना, पण माझ्या गोरगरिबांची मुले तिथे लागली ना कामाला. पंपावर काम करणे कमीपणाचे नाही. पंपावरच पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाले. त्यामुळे पडेल ते काम करण्याची तयारी असली पाहिजे. जर मी सहकार मोडायला निघालो असतो, तर मी संस्था मोठ्या केल्या असत्या का? माझा खासगी कारखाना काढण्याची तयारी नव्हती. सरकारने बंधने घातली. पण आमचे आम्ही कारखाने कुणाला चालवायला दिले नाही.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या