पिंपरी-चिंचवड -राष्ट्रवादीचे शरद पवार (Shard Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र येण्याची गेल्या जोरदार चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. स्वतः शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी या संदर्भात एक सूचक वक्तव्य केल्यावर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून यासंदर्भात वक्तव्ये केली जात होती. मात्र शरद पवार यांनी स्षष्ट केले की, संधीसाधूपणा करणाऱ्यांसोबत जाणार नाही. कोणासोबत युती करा, पण भारतीय जनता पक्षासोबत नाही.
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये (PimPri Chinchwad शरद पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात ते म्हणाले की, महापालिका निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची फळी तयार करावी लागेल. या नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्याला विकासाची कामे करायची आहेत. येथील नगरपालिका, मनपा अनेक वर्ष काँग्रेसच्या ताब्यात होती. मध्यंतरी काही गडबड झाली आणि भाजपाची सत्ता या ठिकाणी आली.
ते पुढे म्हणाले की, सगळ्यांना बरोबर घेतले पाहिजे, हे विधान वारंवार केले जाते. पण सगळे म्हणजे नेमके कोण? फुले-शाहू-आंबेडकर आणि गांधी-नेहरू-चव्हाण यांचा विचार मानणारे असतील, तर मला ते मान्य आहेत. पण जे सत्तेसाठी भाजपाच्या सोबत गेले, ते काँग्रेसच्या विचारांचे असू शकत नाहीत. अशा संधीसाधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहन देता कामा नये. जे गेले त्यांची चिंता करू नका. माझ्या राजकीय आयुष्यात मला अनेक वेळा सहकारी सोडून गेले. पण मी कधीही चिंता केली नाही. कार्यकर्त्यांनी आणि जनतेने मला साथ दिली, आणि त्याच जोरावर मी पुन्हा सत्तेत आलो. लोक शहाणे आहेत. आज ही लोकशाही जनतेच्या शहाणपणामुळेच टिकून आहे आणि पुढेही तशीच टिकून राहणार आहे.
शरद पवार यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








