Home / देश-विदेश / नरेंद्र मोदी आणि कॅनेडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात महत्त्वपूर्ण भेट, ‘या’ मुद्यांवर झाली चर्चा

नरेंद्र मोदी आणि कॅनेडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात महत्त्वपूर्ण भेट, ‘या’ मुद्यांवर झाली चर्चा

PM Modi Mark Carney Meeting | कॅनडातील कॅनॅनास्किस येथे झालेल्या जी7 परिषदेत (G7 Summit) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि...

By: Team Navakal
PM Modi Mark Carney Meeting

PM Modi Mark Carney Meeting | कॅनडातील कॅनॅनास्किस येथे झालेल्या जी7 परिषदेत (G7 Summit) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि कॅनेडियन पंतप्रधान मार्क कार्नी (Mark Carney) यांच्यात महत्त्वपूर्ण भेट झाली. 2023 मध्ये खलिस्तान समर्थक नेते हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर (Nijjar Killing) भारत-कॅनडा संबंध तणावग्रस्त झाले होते. त्यानंतर आता दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची भेट झाली आहे.

या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत-कॅनडा संबंध पुन्हा रुळावर आणण्यासाठी पावलं उचलण्यास सहमती दर्शवली. यामध्ये एकमेकांच्या देशाच्या राजधानीत उच्चायुक्त पुनर्स्थापित करणं आणि थांबलेल्या व्यापार वाटाघाटी पुन्हा सुरू करणं यांचा समावेश आहे.

दोन्ही नेत्यांनी व्यापार, संपर्कआणि कनेक्टिव्हिटीवर वरिष्ठ स्तरावरील संवाद पुन्हा सुरू करण्याचे निश्चित झाले. त्यांनी स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता, अन्न सुरक्षाआणि क्रिटिकल मिनरल्स यावर सहकार्य वाढवण्याची योजना आखली. कॅनेडियन पंतप्रधान कार्नी यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी, दडपशाही आणि नियम-आधारित व्यवस्था यावर चर्चा केली.

या भेटीबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले, “मार्क कार्नी यांच्यासोबतची भेट उत्कृष्ट होती. जी7 परिषद यशस्वी आयोजनासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. भारत आणि कॅनडा लोकशाही आणि कायद्याच्या आधारावर जोडले गेले आहेत. व्यापार, ऊर्जा, अंतराळ आणि खते यासारख्या क्षेत्रांत प्रचंड संधी आहे.” कार्नी यांनी भारताच्या जी7 मधील योगदानाचं कौतुक करत, ऊर्जा परिवर्तन आणि दहशतवादाविरुद्धच्या लढ्याचं महत्त्व अधोरेखित केलं.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या भेटीबाबत माहिती देताना सांगितले की, “ही भेट अत्यंत रचनात्मक होती. दोन्ही नेत्यांनी परस्पर आदर आणि सार्वभौमत्वाच्या आधारावर संबंध दृढ करण्याचं ठरवलं. उच्चायुक्तांची नियुक्ती आणि व्यापार चर्चा लवकर सुरू होतील.” कॅनेडियन पंतप्रधान कार्यालयानेही संबंध मजबूत करण्यावर आणि इंडो-पॅसिफिकमधील भागीदारीवर भर दिला.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या