Home / देश-विदेश / शुभांशु शुक्लांची अंतराळ मोहीम पुन्हा पुढे ढकलली

शुभांशु शुक्लांची अंतराळ मोहीम पुन्हा पुढे ढकलली

नवी दिल्ली – भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला (Shubanshu Shukla यांची बहुप्रतिक्षित एक्सिओम-४ ही अंतराळ मोहीम पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली....

By: Team Navakal
Shubhanshu Shukla space mission


नवी दिल्ली – भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला (Shubanshu Shukla यांची बहुप्रतिक्षित एक्सिओम-४ ही अंतराळ मोहीम पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. उद्या १९ जूनची नवी तारीख या मोहिमेसाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र आज ही मोहीम पुढे ढकलण्याची घोषणा करण्यात आली.


एक्सिओम-४ (Axiom-4) या अंतराळ मोहिमेवर शुक्ला यांच्यासह एकूण चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर जाणार आहे. चौदा दिवसांची ही मोहीम असणार आहे. शुक्ला हे या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत.


अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क (elon musk) यांच्या स्पेसएक्स कंपनीचे फाल्कन-९ या रॉकेटच्या साह्याने अंतराळवीर अवकाश स्थानकावर पोहोचणार आहे. मात्र खराब हवामान आणि रॉकेटच्या इंधन टाकीतून झालेली गळती अशा कारणांमुळे रॉकेटचे प्रक्षेपण वारंवार लांबणीवर टाकावे लागले आहे. सर्वप्रथम २९ मे रोजी रॉकेटचे प्रक्षेपण होणार होते.मात्र खराब हवामानामुळे ते पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत पाच वेळा प्रक्षेपण रद्द करण्यात आले. आता १९ जूनचे प्रक्षेपणही रद्द करण्यात आले असून २२ जून ही प्रक्षेपणाची पुढची ताऱीख असू शकेल,असे सांगण्यात येत आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या