Home / महाराष्ट्र / उबाठाचा जीव पालिकेच्या तिजोरीत! मराठी माणसासाठी काय केले सांगा! एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

उबाठाचा जीव पालिकेच्या तिजोरीत! मराठी माणसासाठी काय केले सांगा! एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

मुंबई- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपला वर्धापन दिन आज वरळीच्या डोममध्ये साजरा केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून...

By: E-Paper Navakal

मुंबई- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपला वर्धापन दिन आज वरळीच्या डोममध्ये साजरा केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा, मराठी माणसाचा विश्वासघात केला. तुम्ही मराठी माणसांसाठी काय केले, याचा हिशेब द्या. तुमच्या नाकर्तेपणामुळे मुंबईतील मराठी माणूस हद्दपार झाला. राक्षसांचा जीव जसा पोटात असतो तसा यांचा जीव पालिकेच्या तिजोरीत आहे. मुंबईत सत्तेत असताना तिजोरी फोडा आणि सत्तेत नसताना मुंबईचा लढा, असा यांचा प्रकार आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच मतदार यावेळीही तुम्हाला जागा दाखवतील.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आज दुसरा ही एक मेळावा सुरू आहे, मी सांगतो की, आपला मेळावा बाळासाहेबांचा विचारांचा आहे. त्यांचा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे. 2024 मध्ये आपण 80 पैकी 60 जागा जिंकल्या. तर उबाठाने 85 पैकी अवघ्या 20 जागा जिंकल्या. आपल्या पक्षाच्या एक तृतीयांश मते त्यांना मिळाली नाहीत. 20 पैकी 7 ते 8 जागा त्यांनी काठावर जिंकल्या. त्यांच्या उर्वरित जागा काँग्रेसच्या मेहेरबानीवर जिंकल्या. जनतेने या निवडणुकीमध्ये बिन पाण्याची हजामत करून टाकली. आपल्याकडे आत्मविश्वास तर त्यांच्याकडे अहंकार आहे. अहंकारी लोकांचा फणा 2024 मध्ये जनतेने ठेचला आहे. सत्तेसाठी लाचारी कोणी केली हे जनतेला माहिती आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा घात केला. हिंदुत्वाचा विश्वासघात केला. सरडा रंग बदलतो. इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडादेखील या महाराष्ट्राने पाहिला. हे मी नाही तर त्यांचेच सगेसोयरे आणि भाऊबंद सांगत आहेत. बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली, पण विचार सोडले नाहीत. विचारांसाठी बाळासाहेबांनी सत्तेलाही लाथ मारली.
पान 1 वरून – तर दुसरीकडे, बाळासाहेबांचे वारसदार म्हणणारे त्यांच्या विचारांना धुळीस मिळवले. बाळासाहेब असते तर त्यांना मिरचीची धूरी दिली असती. एकनाथ शिंदे म्हणाले की, कमॉन कील मी. मला वाटते ते इंग्लिश पिक्चर बघून आले असतील. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की, मेलेल्या माणसाला काय मारणार? कारण महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत तुमचा मुडदा पाडलेला आहे. वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्यासाठी वाघाचे काळीज आणि मनगटात जोर लागतो. तो दम शिवसैनिकांत आहे. त्यामुळे आमच्या नादाला तुम्ही लागू नका. तुमचा टांगा पलटी घोडे फरार आम्ही केले आहे. बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा सच्चा कार्यकर्ता मी आहे.
लाडकी बहीणनंतर
लाडकी सून

एकनाथ शिंदे यांनी आजच्या कार्यक्रमात लाडकी सून अभियानाच्या लोगोचेही अनावरण केले. लाडक्या सुनेचे संरक्षण हेच शिवसेनेचे वचन, अशी नवी घोषणाही कार्यक्रमाच्या ठिकाणी लिहिलेली होती. शिंदे म्हणाले की, लाडक्या सुनेचे संरक्षण हेच शिवसेनेचे वचन आहे. अन्याय होत असेल, तर लाडक्या सुनेने शिवसेनेच्या शाखेला भेट द्यावी. माझ्या पक्षातील महिला कार्यकर्त्या लाडक्या सुनेसाठी धावून जातील.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या