Home / राजकीय / भाजपा प्रवेशाचा विषय संपला; एकनाथ खडसेंचे वक्तव्य

भाजपा प्रवेशाचा विषय संपला; एकनाथ खडसेंचे वक्तव्य

जळगाव – माझा भाजपा (BJP) प्रवेशाचा विषय केव्हाच संपला आहे. त्याला मी पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार...

By: Team Navakal
Eknath Khadse
Social + WhatsApp CTA

जळगाव – माझा भाजपा (BJP) प्रवेशाचा विषय केव्हाच संपला आहे. त्याला मी पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) (NCP) मध्येच आहे आणि तिथेच राहणार आहे, असे ठाम वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी केले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या घरवापसीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Fadanvis) हे जळगावमध्ये क्रांतिकारी खाजाजी नाईक स्मारक, हिंदू गोर बंजारा आणि लबाना समाज कुंभ प्रेरणा स्थळाच्या उद्घाटनासाठी आले होते. या कार्यक्रमाला एकनाथ खडसेही उपस्थित होते. मात्र, त्यांनी व्यासपीठावर जाण्याऐवजी थेट व्हीआयपी कक्षात बसण्याचा निर्णय घेतला.


काही महिन्यांपूर्वी खडसेंनी असा दावा केला होता की, माझा भाजपा प्रवेश जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत झाला होता. मात्र गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामुळे तो अधिकृतरीत्या जाहीर झाला नाही. या वक्तव्यानंतर पुढील काही दिवसांत त्यांची भाजपात वापसी होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, प्रत्यक्षात हा प्रवेश झालाच नाही. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मी भाजपामध्ये जाणार नाही, असे खडसेंनी सांगितले. आजच्या कार्यक्रमात खडसे आणि फडणवीस यांच्यात कोणतीही अधिकृत चर्चा झाली नसली तरी त्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या