Home / देश-विदेश / ‘… म्हणून मी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट नाकारली’, पंतप्रधान मोदींनी स्वतः उघड केले कारण

‘… म्हणून मी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट नाकारली’, पंतप्रधान मोदींनी स्वतः उघड केले कारण

PM Modi On Declined Trump’s Invite | नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जवळपास 35 मिनिटं...

By: Team Navakal
PM Modi On Declined Trump's Invite

PM Modi On Declined Trump’s Invite | नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जवळपास 35 मिनिटं फोनवर चर्चा झाली. या भेटी ऑपरेशन सिंदूरसह अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी ट्रम्प यांनी मोदींना भेटीचे निमंत्रण दिले होते. मात्र, मोदींनी काही कारणास्तव हे निंमंत्रण नाकारले होते. आता मोदींनी या भेटीचे निमंत्रण नाकारल्याचा खुलासा केला.

ओडिशातील भुवनेश्वर येथील एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला. “मला भगवान जगन्नाथांच्या पवित्र भूमीवर परतायचे आहे,” असे सांगत त्यांनी ट्रम्प यांचे निमंत्रण नम्रपणे नाकारले.

पंतप्रधान मोदी नुकतेच कॅनडामध्ये झालेल्या जी-7 शिखर परिषदेसाठी गेले होते. तिथे त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांशी चर्चा केली. जी-7 परिषदेदरम्यानच ट्रम्प यांनी मोदींना फोन करून वॉशिंग्टनला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. “ट्रम्प यांनी मला चर्चा आणि जेवणासाठी आमंत्रित केले. मी त्यांचे आभार मानले, पण सांगितले की मला ओडिशात, भगवान जगन्नाथांच्या भूमीवर जायचे आहे,” असे मोदींनी सभेत सांगितले.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भगवान जगन्नाथ आणि ओडिशाच्या सांस्कृतिक वारशाबद्दल विशेष प्रेम व्यक्त केले. “जगन्नाथांच्या पवित्र भूमीवर परत येणे माझ्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

ओडिशातील विकास प्रकल्पांचे उद्घाटन

भुवनेश्वरमधील या सभेत पंतप्रधानांनी ओडिशातील भाजप सरकारच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सहभाग घेतला. यावेळी त्यांनी 18,600 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. या प्रकल्पांमुळे ओडिशाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

क्वाड परिषदेसाठी ट्रम्प यांना निमंत्रण

दरम्याम, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना यावर्षीच्या उत्तरार्धात होणाऱ्या क्वाड शिखर परिषदेसाठी भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे. जी-7 परिषदेच्या बाजूला दोन्ही नेत्यांची भेट होण्याची शक्यता होती, पण इस्त्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे ट्रम्प यांनी परिषद अर्धवट सोडली होती.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या