Home / देश-विदेश / ‘राफेल’ घ्या, अमेरिकन लढाऊ विमानांवरील अवलंबित्व कमी करा; फ्रान्सच्या पंतप्रधानांचे युरोपियन देशांना आवाहन

‘राफेल’ घ्या, अमेरिकन लढाऊ विमानांवरील अवलंबित्व कमी करा; फ्रान्सच्या पंतप्रधानांचे युरोपियन देशांना आवाहन

Rafale Fighter Jets | फ्रान्सचे लढाऊ विमानं राफेल त्याच्या क्षमतेमुळे सातत्याने चर्चेत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षात देखील भारताकडील या विमानांनी स्वतःची...

By: Team Navakal
Rafale Fighter Jets

Rafale Fighter Jets | फ्रान्सचे लढाऊ विमानं राफेल त्याच्या क्षमतेमुळे सातत्याने चर्चेत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षात देखील भारताकडील या विमानांनी स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे. आता थेट फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनीच यूरोपमधील देशांना राफेल विमानं खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युरोपियन देशांना अमेरिकन लढाऊ विमानांवरील अवलंबित्व कमी करून युरोपची लष्करी स्वायत्तता वाढवण्याचे आवाहन केले आहे. ‘एक्स’ वर एका पोस्टद्वारे त्यांनी फ्रान्सच्या राफेल लढाऊ विमानाला अमेरिकन विमानांना पर्याय म्हणून सादर केले.

या पोस्टमध्ये राफेल जेटच्या मोबाइल इंटरफेसवर “आपल्या युरोपला सुरक्षित करा” असा संदेश दिसत आहे. या पोस्टला “युरोपियन मित्रांनो, तुम्हाला एक कॉल आहे” असे कॅप्शन देण्यात आले आहे.

मॅक्रॉन यांनी युरोपियन सामरिक स्वायत्ततेचा नेहमीच पुरस्कार केला आहे. यावर्षी मार्चमध्येही त्यांनी युरोपियन देशांनी युरोपियन लष्करी उपकरणे खरेदी करून सामूहिक संरक्षण मजबूत करावे, असे सांगितले होते. “अमेरिकन उपकरणांवर अवलंबून असलेल्या देशांना युरोपियन पर्याय उपलब्ध करून द्यावेत. यामुळे उत्पादन वाढेल, खर्च कमी होईल आणि युरोपमध्ये स्वयंपूर्ण संरक्षण जाळे तयार होईल,” असे मॅक्रॉन म्हणाले होते.

मॅक्रॉन यांचे हे आवाहन डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा सत्तेत आल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आले आहे. याशिवाय, F-35 विमानांमध्ये ‘किल स्विच’ असण्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत, ज्यामुळे अमेरिका मित्र राष्ट्रांच्या विमानांना थेट निष्क्रिय करू शकते, अशी शंका व्यक्त केली जात आहे. पेंटागॉनने मात्र या अफवा फेटाळल्या आहेत.

राफेल विरुद्ध F-35: तुलना

फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनने निर्माण केलेले राफेल हे 4.5 जनरेशनचे लढाऊ विमान आहे, जे हवेतून हवेत लढण्यात आणि जमिनीवरील हल्ल्यांमध्ये सक्षम आहे. भारताने नुकतेच पाकिस्तानातील दहशतवादी छावण्या नष्ट करण्यासाठी राफेलचा वापर केला होता. दुसरीकडे, लॉकहूड मार्टिनचे F-35 हे पाचव्या पिढीचे स्टेल्थ लढाऊ विमान आहे, जे प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि सेन्सर्ससाठी ओळखले जाते. पोलंडने 2020 मध्ये 32 F-35 विमानांसाठी 4.6 अब्ज डॉलरचा करार केला, तर फिनलंडने 2021 मध्ये 64 विमानांची ऑर्डर दिली आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या