Home / देश-विदेश / शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम अनिश्चित काळासाठी स्थगित, नेमके कारण काय?

शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम अनिश्चित काळासाठी स्थगित, नेमके कारण काय?

Axiom-4 Space Mission | बहुप्रतिक्षित Axiom-4 अंतराळ मोहीम पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे. ही मोहीम 22 जून 2025 रोजी...

By: Team Navakal
Axiom-4 Space Mission

Axiom-4 Space Mission | बहुप्रतिक्षित Axiom-4 अंतराळ मोहीम पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे. ही मोहीम 22 जून 2025 रोजी लाँच होणार होती. मात्र, आता अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा Axiom Space ने केली आहे. मोहिमेच्या अवघ्या दोन दिवस आधी हा निर्णय घेण्यात आला आहे.

इस्रोच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, नासाने मोहिमेतून माघार घेतल्यामुळे आणि तांत्रिक समस्यांमुळे Axiom-4 अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (आयएसएस) ‘झ्वेझ्दा सेवा मॉड्यूल’च्या दुरुस्तीच्या कामांचे मूल्यांकन करण्यासाठी नासाला अधिक वेळ हवा आहे.

“अंतराळ स्थानके परस्परावलंबी असल्याने, आयएसएस नवीन क्रू मेंबर्ससाठी तयार आहे याची खात्री करणे गरजेचे आहे,” असे Axiom Space ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

इस्रोने या मोहिमेसाठी ग्रुप कॅप्टन शुभ्रांशु शुक्ला (Group Captain Shubhanshu Shukla) यांना मिशन पायलट आणि प्रशांत बालकृष्णन नायर यांना बॅकअप क्रू मेंबर म्हणून नियुक्त केले होते. हे दोन्ही अंतराळवीर गगनयान मोहिमेचाही भाग आहेत.

वारंवार स्थगिती

Axiom-4 मोहिमेला यापूर्वीही अनेकदा स्थगितीचा सामना करावा लागला आहे. सुरुवातीला 29 मे रोजी नियोजित लाँच ‘क्रू ड्रॅगन मॉड्यूल’मधील इलेक्ट्रिकल हार्नेसच्या तपासणीमुळे 8 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर ‘फॅल्कन-9’च्या तयारीतील विलंब आणि फ्लोरिडातील खराब हवामानामुळे लाँच 10 जूनपर्यंत स्थगित झाले.

8 जूनच्या तपासण्यांमध्ये इंजिन बेमध्ये ऑक्सिजन गळती आणि इंजिन ॲक्च्युएटरमध्ये असामान्यता आढळली. नासा, इस्रो आणि रोसकॉसमॉस यांनी ‘झ्वेझ्दा मॉड्यूल’मधील दाब सिग्नेचर आणि हवाई गळतीच्या समस्यांवरही चिंता व्यक्त केली होती.

इस्रोने Axiom Space, नासा आणि स्पेसएक्सला ‘इन-सिटू’ दुरुस्ती आणि कमी तापमानाच्या गळती चाचणीची शिफारस केली होती. या तांत्रिक आव्हानांमुळे मोहिमेची नवीन लाँच तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. Axiom-4 ही 14 दिवसांची मानवयुक्त मोहीम अमेरिका, पोलंड, हंगेरी आणि भारतातील चार अंतराळवीरांना आयएसएसवर घेऊन जाणार होती. नासाकडून मोहिमेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या