Home / अर्थ मित्र / आता सहज लिंक करता येणार ‘पॅन-बँक खाते’, NPCI ची नवी सुविधा सुरू; करदात्यांना होणार फायदा

आता सहज लिंक करता येणार ‘पॅन-बँक खाते’, NPCI ची नवी सुविधा सुरू; करदात्यांना होणार फायदा

PAN-Bank Account Link | नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) आयकर ई-फायलिंग वेबसाइटवर पॅन आणि बँक खाते लिंक करण्यासाठी एक...

By: Team Navakal
PAN-Bank Account Link

PAN-Bank Account Link | नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) आयकर ई-फायलिंग वेबसाइटवर पॅन आणि बँक खाते लिंक करण्यासाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे करदात्यांना त्यांच्या पॅन-बँक खात्याच्या लिंकिंगची पडताळणी जलद आणि सुलभपणे करता येणार आहे.

एनपीसीआयच्या या सुविधेमुळे यामुळे आयकर परतावा आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रक्रिया अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये कोणतीही समस्या येणार नाही.

एनपीसीआयच्या परिपत्रकानुसार, ही सुविधा पॅन तपशील, बँक खात्याची स्थिती आणि खातेधारकाची ओळख बँकेच्या कोअर बँकिंग सिस्टिममधून (CBS) थेट आणि रिअल-टाइममध्ये पडताळण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. यामुळे करदात्यांना आयकर प्रक्रियेदरम्यान होणारा विलंब कमी होईल आणि फसवणुकीचा धोका कमी होण्यास मदत होईल.

या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात, NPCI ने सरकारी विभागांसाठी विशेष पॅन आणि बँक खाते पडताळणीसाठी देखील नवीन प्रणाली आहे. यामुळे बँकेच्या सीबीएसमधून पॅन तपशील, खातेधारकाचे नाव आणि बँक खात्याची स्थिती रिअल-टाइममध्ये तपासणे शक्य होईल.

आयकर परताव्यासाठी फायदा

या नवीन सुविधेमुळे आयकर परतावा आणि थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल. “रिअल-टाइम पडताळणीमुळे विलंब कमी होईल आणि फसवणुकीचा धोका कमी होईल,” यासाठी बँकांना त्यांच्या सिस्टीममध्ये आवश्यक बदल करावे लागतील, ज्यामध्ये सायबर सुरक्षेची आव्हानांचाही समावेश असू शकते. या सुविधेमुळे भारतातील डिजिटल पेमेंट इकोसिस्टिम अधिक मजबूत होण्यास मदत होईल.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या