Home / देश-विदेश / कपिल वाधवान यांच्या जामिनावर दोन आठवड्यांत निर्णय घ्या ! सुप्रिम कोर्टाचे हायकोर्टाला निर्दश

कपिल वाधवान यांच्या जामिनावर दोन आठवड्यांत निर्णय घ्या ! सुप्रिम कोर्टाचे हायकोर्टाला निर्दश

नवी दिल्ली – कोट्यवधी रुपयांच्या बँक फसवणूकप्रकरणी आरोपी दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (Dewan Housing Finance Ltd) तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक कपिल...

By: Team Navakal
Supreme Court

नवी दिल्ली – कोट्यवधी रुपयांच्या बँक फसवणूकप्रकरणी आरोपी दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (Dewan Housing Finance Ltd) तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान (Kapil Wadhawan)यांच्या जामीन अर्जावर २ आठवड्यांत निर्णय घ्या,असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिल्ली उच्च न्यायालयाला (Delhi High Court) दिले.
युनियन बँकेच्या नेतृत्वाखालील १७ राष्ट्रीयीकृत बँकांचे ४२ हजार ८७१ कोटी रुपयांचे कर्ज थकवल्याप्रकरणी कपिल वाधवान आणि त्यांचे बंधू धिरज वाधवान यांना सीबीआयने १९ जुलै २०२२ रोजी अटक केली.९ सप्टेंबर २०२४ रोजी वैद्यकीय कारणास्तव न्यायालयाने धिरज वाधवान यांची अंतरिम जामिनावर मुक्तता केली. मात्र कपिल वाधवान यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने वारंवार फेटाळला.
कपिल वाधवान यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी १८ जुलै रोजी होणार आहे. तत्पुर्वी कपिल वाधवान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.न्या. उज्जल भूयान आणि न्या मनमोहन या सुट्टीकालिन खंडपीठासमोर त्यांच्या अर्जावर सुनावणी झाली. त्याप्रसंगी न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाला हे निर्देश दिले.

Web Title:
संबंधित बातम्या