Home / महाराष्ट्र / बीडमध्ये ८० हजारांच्या वसुलीसाठी तरुणाचे अपहरण

बीडमध्ये ८० हजारांच्या वसुलीसाठी तरुणाचे अपहरण

बीड – वाढत्या गुन्हेगारीमुळे चर्चेत असलेल्या बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्याजावर दिलेल्या ८० हजार रुपयांची वसुली...

By: Team Navakal
A young man was kidnapped

बीड – वाढत्या गुन्हेगारीमुळे चर्चेत असलेल्या बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्याजावर दिलेल्या ८० हजार रुपयांची वसुली करण्यासाठी येथे एका तरुणाचे अपहरण (kidnapping) करण्यात आले. ही घटना धारूर तालुक्यातील आहे.
अपहरण झालेल्या तरुणाचे नाव कृष्णा मैंद आहे. काही महिन्यांपूर्वी कृष्णाने धनराज चाटे, पृथ्वीराज आणि परमेश्वर या तिघांकडून १० हजार रुपये उसने घेतले होते. आरोपींनी दररोज १ हजार रुपयांचे व्याज लावून ती रक्कम तब्बल ८० हजारांपर्यंत गेली.रक्कम परत न केल्यामुळे आरोपींनी कृष्णाचे अपहरण केले आणि त्याच्या आईला फोन करून धमकी दिली की मुलगा जिवंत पाहिजे असेल, तर ५० हजार रुपये पाठवा, अन्यथा तो कधीच दिसणार नाही. या धमकीमुळे घाबरलेल्या कृष्णाच्या आईने तात्काळ धारूर पोलिसांशी संपर्क साधला.पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपास सुरू केला. अंबाजोगाईजवळील साकुर गावातून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, उर्वरित दोघे अद्याप फरार आहेत. अपहरण झालेल्या कृष्णा मैंदची सुटका करण्यात आली आहे.

Web Title:
For more updates: , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या