Home / देश-विदेश / तुमचा मेंदू ChatGPT मुळे ‘मंद’ होतोय का? MIT च्या अभ्यासातून मोठा खुलासा

तुमचा मेंदू ChatGPT मुळे ‘मंद’ होतोय का? MIT च्या अभ्यासातून मोठा खुलासा

ChatGPT Impact MIT Study | आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स, विशेषतः ChatGPT चा शैक्षणिक कामांसाठी वापर केल्याने विद्यार्थ्यांची क्रिटिकल थिंकिंग आणि...

By: Team Navakal
ChatGPT Impact MIT Study

ChatGPT Impact MIT Study | आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स, विशेषतः ChatGPT चा शैक्षणिक कामांसाठी वापर केल्याने विद्यार्थ्यांची क्रिटिकल थिंकिंग आणि मेंदूचा सहभाग कमी होऊ शकतो, असा धक्कादायक खुलासा MIT च्या मीडिया लॅबच्या नवीन अभ्यासात झाला आहे. ChatGPT सारख्या AI टूल्समुळे विद्यार्थी अधिक निष्क्रिय होत असून, त्यांचा मेंदूचा वापर कमी होत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.

अभ्यास कसा झाला?

मानवी क्षमतांवर जनरेटिव्ह AI च्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी, संशोधकांनी बॉस्टनमधील 18 ते 39 वयोगटातील 54 विद्यार्थ्यांना तीन गटांमध्ये विभागले. प्रत्येक गटाला SAT-शैलीतील निबंध लिहिण्यास सांगितले. पहिल्या गटाने OpenAI च्या ChatGPT चा वापर केला, दुसऱ्या गटाने Google Search वापरले, तर तिसऱ्या गटाने कोणत्याही डिजिटल साधनांशिवाय निबंध लिहिला. यावेळी इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफी (EEG) द्वारे मेंदूच्या 32 भागांचे स्कॅन करून सहभाग तपासला गटला.

अभ्यासातून असे दिसून आले की, ChatGPT वापरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेंदूची क्रियाशीलता सर्वात कमी होती. या विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता, स्मृती आणि शब्दांचा अर्थ लावण्याच्या प्रक्रियेत कमी कामगिरी दर्शवली. अनेकांनी ChatGPT च्या उत्तरांना थेट कॉपी-पेस्ट केला, स्वतःच्या विचारांचा वापर टाळला. याउलट, कोणत्याही साधनांशिवाय निबंध लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक मेंदूची क्रियाशीलता दाखवली, विशेषतः सर्जनशीलता आणि गहन विचारांशी संबंधित क्षेत्रांत.

Google Search वापरणाऱ्या गटानेही तुलनेने चांगली कामगिरी केली, ज्यामुळे पारंपरिक शोध इंजिन्स अजूनही सक्रिय विचारांना प्रोत्साहन देतात, असे दिसते.

दीर्घकालीन परिणामांचा धोका

संशोधक नतालिया कॉस्मिन्या यांनी सांगितले, “ChatGPT मुळे काम जलद होऊ शकते, पण त्यातून मिळणारी माहिती तुमच्या स्मृतीत टिकत नाही.” AI टूल्समुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि मेंदूचा विकास दीर्घकाळात बाधित होऊ शकतो, असा इशारा अभ्यासात देण्यात आला. स्वतःच्या विचारांशिवाय काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना नंतर माहिती आठवण्यात आणि समजण्यात अडचणी आल्या.

ज्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही साधनांशिवाय निबंध लिहिले, त्यांनी आपल्या कामावर समाधान आणि मालकी हक्क नोंदवला. त्यांच्या EEG अहवालात गहन विचार आणि सर्जनशीलतेशी संबंधित मेंदूच्या लहरी (अल्फा, थिटा, डेल्टा) अधिक सक्रिय दिसल्या.

अभ्यासाच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना त्यांचे निबंध पुन्हा लिहिण्यास सांगितले, पण यावेळी साधने बदलण्यात आली. ChatGPT यूजर्सला स्वतःच्या मेंदूचा वापर करायला सांगितले, तर स्वतंत्र गटाला AI चा वापर करायला सांगितले. यातही AI वर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांना माहिती आठवण्यात अडचणी आल्या, तर स्वतंत्र गटाने AI वापरतानाही चांगली कामगिरी दर्शवली.

शिक्षणासाठी AI चा वापर कसा करावा?

या अभ्यासाने AI टूल्सचा शैक्षणिक वापर काळजीपूर्वक करावा, असा सल्ला दिला आहे. AI जलद आणि कार्यक्षम आहे, पण त्याचा अतिवापर विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला मारक ठरू शकतो. शिक्षणतज्ज्ञांनी AI चा वापर पूरक साधन म्हणून करण्यावर भर दिला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि गहन विचारक्षमता टिकून राहील.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या