Home / देश-विदेश / शुभांशु शुक्ला उद्या अंतराळात झेपावणार

शुभांशु शुक्ला उद्या अंतराळात झेपावणार

नवी दिल्ली – भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला (Shubhanshu Shukla) हे उद्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने झेपावणार आहेत. अ‍ॅक्सिओम-४ (Axiom-4) या...

By: Team Navakal
Axiom-4 will launch into space

नवी दिल्ली – भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला (Shubhanshu Shukla) हे उद्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने झेपावणार आहेत. अ‍ॅक्सिओम-४ (Axiom-4) या खासगी अंतराळ मोहिमेद्वारे त्यांची ही उड्डाण मोहीम स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटच्या (Space X Falcon-9 rocket) सहाय्याने अमेरिकेतील फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटर येथून होणार आहे. भारतीय वेळेनुसार हे प्रक्षेपण उद्या दुपारी १२ वाजता होईल.

या मिशनमध्ये भारतासोबत (India) हंगेरी (Hungary) आणि पोलंड या देशांचाही सहभाग आहे. तिन्ही देशांसाठी ही मोहीम ऐतिहासिक मानली जात आहे. विशेषतः भारतासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे, कारण अनेक दशकांनंतर प्रथमच एक भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय पातळीवर अंतराळात झेपावणार आहे. या मोहिमेत शुभांशु शुक्ला हे पायलट म्हणून सहभागी होत आहेत. त्यांच्या सोबत हंगेरीचे तिबोर कापु आणि पोलंडचे स्लावोस उझ्नान्स्की-विस्नेव्स्की हे ‘मिशन स्पेशलिस्ट’ म्हणून सहभागी आहेत.

या मोहिमेचे प्रक्षेपण याआधी अनेक वेळा पुढे ढकलण्यात आले होते. सुरुवातीला हे प्रक्षेपण २९ मे रोजी होण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर ८, १० आणि ११ जून या तारखाही निश्चित करण्यात आल्या. मात्र, स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटमध्ये इंधन गळतीची समस्या उद्भवल्याने आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या रशियन विभागात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने मोहीम पुन्हा स्थगित करण्यात आली. त्यानंतर १९ आणि २२ जून या तारखा प्रक्षेपणासाठी निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील दुरुस्ती आणि तपासणीच्या कारणास्तव हे प्रक्षेपण पुन्हा पुढे ढकलावे लागले.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या