Home / महाराष्ट्र / मंत्रालयाच्या गार्डन गेटजवळ अद्ययावत व्हिजिटर प्लाझा ! ६४ लाख खर्च करणार

मंत्रालयाच्या गार्डन गेटजवळ अद्ययावत व्हिजिटर प्लाझा ! ६४ लाख खर्च करणार

मुंबई– मंत्रालय हे ठिकाण अतिशय संवेदनशील मानले जाते. कारण येथे शासकीय कामकाज चालते आणि अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. या...

By: Team Navakal
Mantralaya

मुंबई– मंत्रालय हे ठिकाण अतिशय संवेदनशील मानले जाते. कारण येथे शासकीय कामकाज चालते आणि अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. या मंत्रालयाच्या (Mantralaya)सुरक्षेसाठी गार्डन गेटजवळ मोकळ्या जागेत अद्ययावत व्हिजिटर प्लाझा (Modern Visitor Plaza)उभारला असून आता तिथे चेकिंग पोस्ट उपलब्ध केले जाणार आहे. या नवीन अद्ययावत प्लाझासाठी ६४ लाख २८ हजार रुपये (₹64.28 lakh for development) करण्यास राज्य सरकारने (Mahayuti government) काल मान्यता दिली.

हे नवीन अद्ययावत प्लाझाचे काम सार्वजनिक विभागाने हाती घेतले असून त्याचा खर्च गृह विभाग उचलणार आहे.या प्लाझामध्ये मंत्रालयात कामासाठी बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी वेटिंग रूम (room), बॅगा ठेवण्यासाठी लॉकर,स्कॅनर, अद्ययावत सुरक्षा तपासणी कक्ष, पास काऊंटर आदी सुविधा (facility) असणार आहेत. सध्या अभ्यागतांना गार्डन गेटजवळच्या तात्पुरत्या ठिकाणाहून मंत्रालय प्रवेश दिला जातो. हे काऊंटर आकाशवाणी (Akashvani)सभागृहासमोर असल्याने आमदार वसतिगृह आणि मंत्रालयाला जोडणारा रस्ता वाहनांच्या लांब रांगांनी भरलेला दिसतो.त्यामुळे वाहनचालकांना मंत्रालयाच्या इमारतीकडे प्रवेश करणे कठीण होत आहे.

Web Title:
संबंधित बातम्या