Home / देश-विदेश / Raja Raghuvanshi Case| सोनम आणि राज कुशवाहने प्रेमसंबंधांची कबुली दिली

Raja Raghuvanshi Case| सोनम आणि राज कुशवाहने प्रेमसंबंधांची कबुली दिली

शिलाँग – मध्य प्रदेशच्या इंदूरचे व्यावसायिक राजा रघुवंशी ( Raja Raghuvanshi Case) यांची हत्या करणारी त्यांची पत्नी सोनम रघुवंशी (Sonam...

By: Team Navakal


शिलाँग – मध्य प्रदेशच्या इंदूरचे व्यावसायिक राजा रघुवंशी ( Raja Raghuvanshi Case) यांची हत्या करणारी त्यांची पत्नी सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi)आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांनी आपले प्रेम संबंध असल्याची कबुली दिली आहे,अशी माहिती मेघालय पोलिसांनी दिली.


पोलीस (police) अधीक्षक विवेक सय्याम यांनी सांगितले की, सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांनी त्यांचे प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे.या दोघांनी राजा रघुवंशी यांच्या हत्येचा कट रचल्याची कबुलीही दिली आहे.सोनम आणि राज कुशवाह यांचे प्रेमसंबंध सोनमच्या कुटुंबाला मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी सोनमचे राजा रघुवंशीशी लग्न लावून दिले. त्याचवेळी सोनमने आपल्या कुटुंबियांना माझे राजाशी लग्न लावून द्याल तर मी काय करेन ते तुम्ही बघाच,असा इशारा दिला होता.


सोनम आणि राजा रघुवंशी यांचे ११ मे रोजी लग्न झाले होते.२० मे रोजी हे दाम्पत्य मेघालयमध्ये मधुचंद्रासाठी आले होते.तिथेच सोनम आणि राज कुशवाह यांनी कट रचून भाडोत्री मारेकऱ्यांकरवी राजा रघुवंशी यांची २३ मे रोजी हत्या केली.संपूर्ण देशात सध्या या घटनेची चर्चा आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या