Home / देश-विदेश / ‘काही लोकांसाठी मोदी आधी, देश नंतर’, खरगेंच्या टीकेनंतर शशी थरूर यांचे सूचक ट्वीट, म्हणाले…

‘काही लोकांसाठी मोदी आधी, देश नंतर’, खरगेंच्या टीकेनंतर शशी थरूर यांचे सूचक ट्वीट, म्हणाले…

Shashi Tharoor Post | खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) व काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ नेत्यांमध्ये गेल्याकाही दिवसांपासून मतभेद असल्याचे पाहायला मिळत...

By: Team Navakal
Shashi Tharoor Post

Shashi Tharoor Post | खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) व काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ नेत्यांमध्ये गेल्याकाही दिवसांपासून मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता त्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या टीकेला एका सूचक ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. थरूर यांची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

खरगे यांनी थरूर यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्तुतीवर अप्रत्यक्षपणे टीका केल्यानंतर, थरूर यांनी ‘एक्स’वर एक फोटो शेअर केला. यामध्ये लिहिले आहे की, “उडण्यासाठी परवानगी मागू नका. पंख तुमचे आहेत आणि आकाश कोणाचेही नाही.”

खरगे यांच्या टीकेला थरूर यांनी अप्रत्यक्षरित्या प्रत्युत्तर दिल्याची चर्चा या पोस्टमुळे रंगली आहे. थरूर यांनी काँग्रेस पक्ष त्यांना वारंवार लक्ष्य करत असल्याबद्दल एक अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

खरगेंनी केली होती टीका?

काही दिवसांपूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी विविध देशात गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करून परतलेल्या शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “भारतासाठी एक मौल्यवान मालमत्ता” असे संबोधले होते. सोबतच, त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. या वक्तव्यावर काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

खरगे म्हणाले, “शशी थरूर यांची भाषा खूप प्रभावी आहे, म्हणूनच त्यांना काँग्रेस कार्यकारिणीत ठेवले आहे. आम्ही ‘देश प्रथम’ म्हणतो, पण काही लोक ‘मोदी प्रथम’ आणि नंतर देश, असे म्हणतात.”

खरगे पुढे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर वेळी विरोधी पक्ष आणि आम्ही भारतीय लष्कराच्या पाठीशी असल्याचे सांगत होतो. आमच्यासाठी देश सर्वप्रथम आहे. पण काही लोक आता मोदी प्रथम आणि देश द्वितीय असल्याचे सांगत आहेत. तर त्यात काय करणार?

खरगे यांचे हे वक्तव्य थरूर यांच्या स्पष्टीकरणानंतर आले. थरूर यांनी यापूर्वी सांगितले होते की, ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी नाही, तर राष्ट्रीय एकता आणि देशासाठी उभे राहण्याचे प्रतीक आहे. यासोबतच, आता खरगे यांच्या टीकेनंतर त्यांनी पोस्ट करत पक्षाला अप्रत्यक्षपणे उत्तर दिले.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या