Home / देश-विदेश / पाकिस्तानला माहिती देणाऱ्या नौदलाच्या कर्मचाऱ्याला अटक

पाकिस्तानला माहिती देणाऱ्या नौदलाच्या कर्मचाऱ्याला अटक

नवी दिल्ली – ऑपरेशन सिंदूरची (Operation Sindoor) माहिती पाकिस्तानला देणाऱ्या दिल्लीतील नौदलाचा (Navy) कर्मचारी विशाल यादवला ( Vishal Yadav) राजस्थान...

By: Team Navakal
Navy staffer arrest
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – ऑपरेशन सिंदूरची (Operation Sindoor) माहिती पाकिस्तानला देणाऱ्या दिल्लीतील नौदलाचा (Navy) कर्मचारी विशाल यादवला ( Vishal Yadav) राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर शाखेने अटक केली. त्याच्याव ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला (ISI) गोपनीय संरक्षण माहिती पुरवल्याच्या आरोप आहे.

विशाल यादव हा हरियाणाचा (Haryana) रहिवासी आहे. तो दिल्लीतील नौदल मुख्यालयात लिपिक म्हणून काम करतो. त्याच्यावर भारतीय नौदल आणि इतर संरक्षण संस्थांशी संबंधित संवेदनशील पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे.राजस्थानच्या सीआयडी इंटेलिजेंस युनिटने अनेक महिन्यांच्या देखरेखीनंतर त्याला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, विशाल यादव हा प्रिया शर्मा नावाच्या एका पाकिस्तानी (Pakistan)महिलेस संपर्कात होता आणि तिला नौदल तसेच इतर संरक्षण संस्थांशी संबंधित गोपनीय माहिती पुरवत होता. ऑपरेशन सिंदूरदरम्यानदेखील तो ही माहिती पाकिस्तानी महिलेला पुरवत होता. तो वारंवार पाकिस्तानी हँडलरच्या ऑनलाइन संपर्कात होता. यासाठी तो पाकिस्तानी हँडलरकडून क्रिप्टोकरन्सी व थेट बँक ट्रान्सफरद्वारे पैसे घेत होता.

Web Title:
संबंधित बातम्या