Home / राजकीय / अदानीला हाकलून देणे हाच महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट ! संजय राऊतांचा हल्लाबोल

अदानीला हाकलून देणे हाच महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट ! संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई – शक्तिपीठ महामार्गासाठी (Shaktipeeth Highway) २० हजार कोटींची मंजुरी दिल्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut)यांनी आज...

By: Team Navakal
sanjay raut

मुंबई – शक्तिपीठ महामार्गासाठी (Shaktipeeth Highway) २० हजार कोटींची मंजुरी दिल्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut)यांनी आज पुन्हा एकदा महायुती सरकार (Mahayuti government) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. शक्तिपीठ हा फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट (dream project)आहे असे सांगितले जाते. त्याचा संदर्भ देते महाराष्ट्रासाठी खरा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे अदानीला हाकलून देणे हा आहे. फडणवीस तो पूर्ण करतीला का,असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले, “राज्य सरकार म्हणते की ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी पैसे नाहीत, म्हणून ती अडचणीत येते. पण त्याच सरकारने शक्तिपीठ महामार्गासाठी २० हजार कोटी मंजूर केले. यामध्ये १० हजार कोटी रुपये ठेकेदारांमार्फत राजकीय वापरासाठी विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वळवले जातील. हे प्रकल्प आपल्या लाडक्या ठेकेदारांसाठीच काढले जातात. या ठेकेदारांना आधीच आश्वासने दिली गेली असून त्यांच्याकडून उचलेले पैसे सत्ताधाऱ्यांकडे जातात. या दलालीतून किमान ५० टक्के हिस्सा सरकारच्या लोकांकडे पोहोचतो. शक्तिपीठ महामार्ग हा देवेंद्र फडणवीस यांना ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र, या महाराष्ट्रातून अदानीला हाकलून देणे हाच महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्प, विशेषतः मुंबईतील योजना, अदानी आणि अन्य गुजराती उद्योगपतींच्या हातात सोपवल्या जात आहेत. अगदी वीज वितरणापासून ते वसुलीपर्यंत सर्वकाही त्यांच्याकडे दिले जाते.

Web Title:
संबंधित बातम्या