Home / राजकीय / ठाण्यात आनंद दिघे यांचे भव्य स्मारक उभारणार एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाण्यात आनंद दिघे यांचे भव्य स्मारक उभारणार एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणे – ठाणे (Thane)शहरात शिवसेनेचे दिग्गज नेते दिवंगत आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe)यांचे भव्य स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा उभारणार अशी...

By: Team Navakal
Eknath Shinde And mentor Anand Dighe


ठाणे – ठाणे (Thane)शहरात शिवसेनेचे दिग्गज नेते दिवंगत आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe)यांचे भव्य स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा उभारणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Dcm Eknath Shinde) यांनी केली आहे.
जुन्या ठाण्यातील तलाव पाळी (Talao Pali)येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर (Chhatrapati Shivaji Maharaj Maidan)हे स्मारक उभारण्यात येईल. त्यासाठी मैदानावरील धर्मवीर आनंद दिघे टॉवरची पुनर्बांधणी करून नवा ४३ मीटर उंचीचा टॉवर उभारण्यात येईल. या टॉवरमध्ये दिघे यांचा पूर्णाकृती पुतळा असेल. त्याचबरोबर मैदानाच्या डागड़ुजीची कामे केली जातील, असे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे यांनी सांगितले. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागाच्या सौंदर्यिकरणाच्या कामाचाही याप्रसंगी शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला

Web Title:
संबंधित बातम्या