Home / Uncategorized / मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवांच्या १९ कारमध्ये पाणीमिश्रित डिझेल

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवांच्या १९ कारमध्ये पाणीमिश्रित डिझेल

रतलाम – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव (Chief Minister Mohan Yadav)यांच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये पाणीमिश्रित डिझेल भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला...

By: Team Navakal
Water-Contaminated Diesel Found in 19 Vehicles

रतलाम – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव (Chief Minister Mohan Yadav)यांच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये पाणीमिश्रित डिझेल भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी रात्री मुख्यमंत्री मोहन यादव यांचा ताफा एमपी राईज २०२५ कॉन्क्लेव्हसाठी रतलाम (Ratlam)येथून रवाना होत असताना हा प्रकार घडला.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हा (Nineteen Innova cars) कार डिझेल भरण्यासाठी ढोसी गावातील (Dhosi village)पेट्रोल पंपावर थांबल्या होत्या. डिझेल भरल्यानंतर काही वेळातच या सर्व गाड्या एकामागून एक बंद पडल्या. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची आणि पोलिसांची मोठी धांदल उडाली.तत्काळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या गाड्यांमधील इंधन काढून पाहिले असता डिझेलमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात मिश्रण असल्याचे आढळले. काही गाड्यांच्या टँकमध्ये २० लिटर डिझेलमध्ये तब्बल १० लिटर पाणी आढळले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.यानंतर प्रशासनाने तातडीने इंदौरहून इतर गाड्या मागवून मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे रवाना केला. या घटनेनंतर ढोसी गावातील संबंधित पेट्रोल पंप सील करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या