Home / महाराष्ट्र / कैद्याला जैन जेवण का नाही? कोर्टाचा तुरुंग अधीक्षकांना सवाल

कैद्याला जैन जेवण का नाही? कोर्टाचा तुरुंग अधीक्षकांना सवाल

मुंबई- मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात अंमलबजावणी संचलनालयाने अटक केलेल्या आणि सध्या आर्थर रोड कारागृहात असलेल्या एका जैनधर्मीय कैद्याला आदेश देऊनही जैन...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA


मुंबई- मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात अंमलबजावणी संचलनालयाने अटक केलेल्या आणि सध्या आर्थर रोड कारागृहात असलेल्या एका जैनधर्मीय कैद्याला आदेश देऊनही जैन पध्दतीचे जेवण का दिले नाही, असा सवाल विशेष पीएमएलए न्यायालयाने कारागृह अधीक्षकांना केला.
रितेश शहा नावाच्या या कैद्याने विशेष पीएमएलए न्यायालयात याचिका दाखल करून आपल्याला तुरुंगात जैन पध्दतीचे जेवण दिले जावे, अशी मागणी केली होती. याचिकेवर 14 मे रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याचे म्हणणे ग्राह्य धरून कारागृह अधीक्षकांना त्याला जैन पध्दतीचे जेवण द्यावे, असे आदेश दिले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही तुरुंग प्रशासनाने त्याला जैन पध्दतीचे जेवण दिले नाही. ही बाब शहाचे वकील विरल बाबर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. आपला अशील जैन धर्माचे काटेकोरपणे पालन करतो. जैन धर्मात जे वर्ज्य मानले जातात, असे कांदा-लसूण असलेले पदार्थ त्यांना चालत नाहीत. न्यायालयाने आदेश देऊनही तुरुंग प्रशासनाने त्यांना जैन पध्दतीचे जेवण दिले नाही. त्यामुळे हा न्यायालयाचाही अवमान आहे, असे शहाच्या वकिलांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने आर्थर रोड कारागृहाचे अधीक्षकांना नोटीस बजावून स्पष्टीकरण देण्यास सांगितले.

Web Title:
संबंधित बातम्या