Home / महाराष्ट्र / पनवेलमध्ये फुटपाथवर नवजात अर्भक आढळले

पनवेलमध्ये फुटपाथवर नवजात अर्भक आढळले

पनवेल – पनवेल (Panvel) शहरातील तक्का परिसरात आज सकाळी बालगृहाच्या (childcare home)बाहेर फुटपाथवर नवजात अर्भक (newborn baby)आढळून आले. सुमारे २०...

By: Team Navakal
Newborn baby found on footpath in Panvel

पनवेल – पनवेल (Panvel) शहरातील तक्का परिसरात आज सकाळी बालगृहाच्या (childcare home)बाहेर फुटपाथवर नवजात अर्भक (newborn baby)आढळून आले. सुमारे २० दिवसांचे हे बाळ एका बास्केटमध्ये ठेवले होते. त्यासोबत सापडलेल्या एका इंग्रजीतील (written in English) भावनिक चिठ्ठीमुळे खळबळ उडाली आहे.

त्या चिठ्ठीत पालकांनी (parents wrote emotional note) लिहिले आहे, आम्ही या बाळाला सांभाळू शकत (unable to take care) नाही. त्याच्या आजारपणाचा खर्च आम्हाला झेपणार नाही. कृपया क्षमा करा. तक्का परिसरातील काही नागरिकांना बास्केटमधून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता, त्यांना हे नवजात बाळ दिसले. त्यांनी तत्काळ पनवेल शहर पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेऊन तातडीने पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

Web Title:
For more updates: , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या