Home / महाराष्ट्र / छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन हजार अतिक्रमणांवर हातोडा

छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन हजार अतिक्रमणांवर हातोडा

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी महापालिकेने अतिक्रमणविरोधात मोठी मोहीम राबवली. मुकुंदवाडी ते केंब्रिजपर्यंत सुमारे तीन हजार...

By: Team Navakal
demolition work in Chhatrapati Sambhajinagar city

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी महापालिकेने अतिक्रमणविरोधात मोठी मोहीम राबवली. मुकुंदवाडी ते केंब्रिजपर्यंत सुमारे तीन हजार व्यावसायिक बांधकामांचे पाडकाम करण्याचे काम आज सुरू करण्यात आले. या कारवाईसाठी महानगरपालिकेचे साडेतीनशे अधिकारी (municipal officers) आणि कर्मचारी तसेच चारशे पोलीस (police)अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. साठ मीटर रुंदीच्या हद्दीत येणारी सर्व बांधकामे हटवण्यासाठी जेसीबी (JCB)आणि बुलडोझरचा (bulldozers)वापर करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मुकुंदवाडी ते चिकलठाणा दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. या मोहिमेला काही नागरिकांनी आव्हान दिले होते. मात्र, मोहिमेस स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. खंडपीठाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने धडक मोहिमेला सुरुवात केली आहे. महावीर चौक ते केंब्रिज शाळा (जालना रोड), सिडको बसस्टँड ते हर्सूल टी पॉइंट, महानुभाव आश्रम ते बीड बायपास, महानुभाव आश्रम ते गेवराई तांडा (महापालिका हद्दीपर्यंत), छावणी ते दौलताबाद टी पॉइंट या पाच रस्त्यांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.
दोन आठवड्यांपूर्वी बीड बायपास रस्त्यावर सुमारे सव्वाचारशेहून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली होती. त्यानंतर पोलिस आयुक्त व महापालिका आयुक्त यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली मुकुंदवाडीत २२९ अतिक्रमणांवर बुलडोजर चालवण्यात आला होता. आज मुकुंदवाडी ते केंब्रिजदरम्यान तीन हजार अतिक्रमणांचे पाडकाम सुरू करण्यात आले.

Web Title:
संबंधित बातम्या