Home / महाराष्ट्र / लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी क्षीरसागरांचा राईट हँड! धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी क्षीरसागरांचा राईट हँड! धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट

बीड– बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे आता आक्रमक...

By: Team Navakal
dhananjay munde vs sandip kshirsagar

बीड– बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे आता आक्रमक झाले आहेत. या प्रकरणातील आरोपी हा ळरद पवार गटाचा आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड आहे, असा गौप्यस्फोट मुंडे यांनी आज केला. आरोपीला अटक करण्यात आली नसून तो पोलिसांना शरण आला आहे, असेही मुंडे त्यांनी म्हटले.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आ. संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेवर आरोप केले होते. आता तेच अडचणीत सापडले आहेत. धनंजय मुंडे म्हणाले की, या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी भेट घेणार असून या प्रकरणात चौकशी सामिती (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी मी करणार आहे. १५० दिवसानंतर मी आज बोलतो. या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. ज्या दिवशी क्लासच्या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला, त्या दिवशी ११ वाजता आरोपी क्षीरसागर यांच्यासोबत होता. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीचे दोन्ही प्राध्यापक आणि क्षीरसागर यांचे सीडीआर काढणे आवश्यक आहे. यापूर्वीही अनेक भगिनींचा यात छळ सुरू होता. मात्र अब्रू जाऊ नये म्हणून त्या पुढे आल्या नाहीत. या प्रकरणात इथल्या आमदाराचे कोणाकोणाशी कनेक्शन आहे हे समजले पाहिजे आणि या प्रकरणाबाबत आम्ही अधिवेशनातही आवाज उठवणार आहोत.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या