Home / देश-विदेश / राममंदिरात टिटॅनियम जाळ्या १,००० वर्षे सुरक्षित राहाणार

राममंदिरात टिटॅनियम जाळ्या १,००० वर्षे सुरक्षित राहाणार

अयोध्या- अयोध्या येथील भगवान राममंदिराचे काम पूर्णहोत आले आहे. हे मंदिर १,००० वर्षे सुरक्षित राहावे यासाठी बांधकामात टायटॅनियम सारख्या उच्च...

By: Team Navakal
ram mandir ayodhya


अयोध्या- अयोध्या येथील भगवान राममंदिराचे काम पूर्णहोत आले आहे. हे मंदिर १,००० वर्षे सुरक्षित राहावे यासाठी बांधकामात टायटॅनियम सारख्या उच्च दर्जाच्या धातूंचा वापर केला जात आहे. राम मंदिरात टायटॅनियमपासून बनवलेल्या ३२ जाळ्या बसवल्या जात आहेत. हे काम सुरू झाले आहे.

अयोध्येतील राम मंदिर केवळ आध्यात्मिक शक्तीचे केंद्रच नाही तर ते आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि सनातन श्रद्धेचे प्रतीकदेखील बनेल, असे प्रयत्न सुरू आहेत. टायटॅनियमसारख्या धातूंचा वापर होणारे राम मंदिर हे पहिलेच मंदिर आहे. मंदिराच्या तळमजल्यावर, पहिल्या मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावर टायटॅनियमपासून बनवलेल्या जाळ्या बसवल्या जात आहे.भारत सरकारची एक संस्था या जाळ्या बनवत आहे. १५ ऑगस्टपर्यंत राम मंदिरात ३२ जाळ्यांचे कामही पूर्ण होईल. राम मंदिरातील सर्व खिडक्यांमध्ये टायटॅनियमच्या जाळ्या बसवल्या जाणार आहे.
टायटॅनियम हा एक विशेष प्रकारचा धातू आहे, जो पाणबुड्यांमध्ये वापरला जातो. या धातूचे वय १००० वर्षांपेक्षा जास्त मानले जाते आणि हा धातू हवामान प्रतिरोधकदेखील असतो. तो कधीही गंजत नाही. हा सामान्य धातूंपेक्षा वेगळा धातू मानला जातो.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या