Home / News / राज्यात उद्यापासून शाळा बस मालकांचे आंदोलन! बस सेवा बंद

राज्यात उद्यापासून शाळा बस मालकांचे आंदोलन! बस सेवा बंद

मुंबई – शालेय वाहतुकीसंदर्भातील अनेक समस्या कायम असून शासन आणि वाहतूक विभागाकडून त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ राज्यातील...

By: Team Navakal
school-bus

मुंबई – शालेय वाहतुकीसंदर्भातील अनेक समस्या कायम असून शासन आणि वाहतूक विभागाकडून त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ राज्यातील शाळा बस मालकांनी २ जुलैपासून संपूर्ण राज्यभरात शाळा बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. स्कूल बस ओनर असोसिएशनने यासंदर्भात पत्रक काढून आंदोलनाची घोषणा केली असून, अनिश्चित काळासाठी ही सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

शाळा बस ओनर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले की, शासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आम्हाला शाळा बससेवा बंद ठेवण्याशिवाय पर्याय नाही. आमची भूमिका सेवा थांबवण्याची नसली तरी सध्याच्या अडचणींमुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे.

संघटनेने आपल्या मागण्यांमध्ये शालेय वाहतूक सेवेसंदर्भातील सर्व शिफारसी शाळा बस सेवेवर लागू केल्याची स्पष्टता देणारे ई-चलान त्वरित रद्द करावे, सर्व मान्यताप्राप्त शाळा बस चालकांना ओळखपत्र द्यावीत, नियमांचे पालन करणाऱ्या बस वाहनांवर अन्यायकारक दंड लादू नये आणि शासन, शाळा प्रशासन व शाळा बस संघटनांचा समावेश असलेला संयुक्त टास्क फोर्स तत्काळ स्थापन करावी अशा मागण्या मांडल्या आहेत. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासावर मोठा परिणाम होणार असून पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या