Home / महाराष्ट्र / नाशिकमध्ये हिट अँड रन! सातवीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

नाशिकमध्ये हिट अँड रन! सातवीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

नाशिक- नाशिकच्या चांदोरीमध्ये हिट अँड रनची घटना घडली. एका डंपरने शाळेत सायकलवरून जाणाऱ्या विद्यार्थिनीला उडवले. ही घटना आज सकाळच्या सुमारास...

By: Team Navakal
hit and run in nasik

नाशिक- नाशिकच्या चांदोरीमध्ये हिट अँड रनची घटना घडली. एका डंपरने शाळेत सायकलवरून जाणाऱ्या विद्यार्थिनीला उडवले. ही घटना आज सकाळच्या सुमारास नाशिक-संभाजीनगर महामार्गावरील नागपूर फाटा परिसरात घडली. या भीषण अपघातात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. ती चांदोरीतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकत होती. या अपघातानंतर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला असून चांदोरी गावातील नागरिकांनी रास्ता रोको केला.

या अपघातानंतर डंपरने समोरून येणाऱ्या एका दुचाकीलाही धडक दिली. यात दुचाकीवरील पती-पत्नीला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी चांदोरी-निफाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. डंपर चालकावर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संतप्त जमावाची समजूत काढली. आंदोलकांना शांत केले.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या