Home / देश-विदेश / रतलाममध्ये सोनम-राजाच्या वस्तू आणि कागदपत्रे सापडली

रतलाममध्ये सोनम-राजाच्या वस्तू आणि कागदपत्रे सापडली

इंदूर – राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील (Raja Raghuvanshi murder case) आरोपी शिलोम जेम्स याच्याशी संबंधित असलेल्या रतलाम येथील एका फ्लॅटमधून...

By: Team Navakal
Sonam-Raja documents found in Ratlam

इंदूर – राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील (Raja Raghuvanshi murder case) आरोपी शिलोम जेम्स याच्याशी संबंधित असलेल्या रतलाम येथील एका फ्लॅटमधून सोनम व राजा रघुवंशी यांचे दागिने जप्त केले आहेत. या दागिन्यांसोबत एक लॅपटॉप (Laptop), पेन ड्राइव्ह (Pen drive) व अनेक महत्त्वाची कागदपत्रेही पोलिसांनी हस्तगत केली. ईस्ट खासी हिल्सचे पोलीस (Police) अधीक्षक विवेक सिएम यांनी सांगितले की, मेघालय एसआयटीने अलकापुरी पोलीस ठाणे अधिकाऱ्यांच्या मदतीने, रतलाम जिल्ह्यातील शिलोम जेम्सच्या संबंधित फ्लॅटमधून राजा व सोनम यांचे दागिने हस्तगत केले.हा फ्लॅट मंगलमूर्ती कॉलनीत असून तो शिलोम जेम्सचा सासरा मनोज गुप्ताचा आहे. झडतीदरम्यान शिलोमची पत्नी आणि मेव्हणीही पथकासोबत होत्या. सर्व वस्तू स्वयंपाकघरात एका बॅगेत लपवून ठेवलेल्या होत्या.


रतलामहून हस्तगत केलेल्या दागिन्यांची ओळख पटवण्यासाठी काल रात्री उशिरा राजाचा भाऊ विपिन रघुवंशी यांना क्राईम ब्रँच पोलीस ठाण्यात बोलावले. त्यांच्याकडून सोनमच्या ओळखीच्या वस्तूंची पुष्टी करण्यासाठी लग्नातील फोटो आणण्यास सांगितले होते. शिलोम जेम्सला २१ जून रोजी देवास जिल्ह्यातील भोंरसा टोल नाक्यावरून पळून जात असताना अटक केली. शिलोमबरोबरच बलबीर अहिरवार आणि लोकेंद्र सिंह तोमर यांना पोलिसांनी २६ जून रोजी शिलाँग येथे आणले. या तिघांविरोधात पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाचा गुन्हा दाखल आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या