जेएनयू विद्यार्थी बेपत्ता प्रकरण बंद करण्याला कोर्टाची संमती

Court Approves Closure of JNU Student Disappearance Case

Court Approves Closure of JNU Student Disappearance Case

नवी दिल्ली – दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (JNU)अर्थात जेएनयुचा बेपत्ता विद्यार्थी(Missing student case) नजीब अहमद(nazib ahmad) याचे प्रकरण बंद करण्याची अनुमती दिली आहे त्याच्या शोधासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI)सर्वतोपरी प्रयत्न केले असून या संदर्भात त्यांना दोषी ठरवता येणार नाही. असेही न्यायालयाने म्हटले आहे. सीबीआयने या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट(closer report) न्यायालयाला सादर केल्यानंतर ही परवानगी देण्यात आली.
नजीब अहमद या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याची अभाविपच्या कार्यकर्त्यांबरोबर हाणामारी झाली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी १५ ऑक्टोबर २०१६ पासून तो त्याच्या माही मांडवी येथील वसतिगृहातून बेपत्ता झाला. तो बेपत्ता झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर हा तपास सीबीआयला सोपवण्यात आला. मात्र सीबीआयलाही इतक्या वर्षात त्याचा कोणताही ठावठिकाणा शोधून काढता आला नाही. त्यामुळे हे प्रकरण बंद करण्यासाठी त्यांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्याची आई फातिमा नफीस यांनी म्हटले आहे की, मी वकीलांबरोबर चर्चा करुन या संदर्भात कोणती कायदेशीर लढाई लढायचे हे ठरवणार असून आपल्या मुलाची शेवटच्या श्वासापर्यंत वाट पाहणार आहे.