Home / महाराष्ट्र / परिवहन मंडळाच्या जागेवरील होर्डिंगचे भाडे ठेकेदाराने बुडवले

परिवहन मंडळाच्या जागेवरील होर्डिंगचे भाडे ठेकेदाराने बुडवले

मुंबई – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (Road Transport Corporation) अखत्य़ारितील जागेवरील होर्डिंग ठेकेदाराने मे ते डिसेंबर २०२४ चे मासिक परवाना...

By: Team Navakal
minister pratap sarnaik

मुंबई – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (Road Transport Corporation) अखत्य़ारितील जागेवरील होर्डिंग ठेकेदाराने मे ते डिसेंबर २०२४ चे मासिक परवाना भाडे थकवले असून त्यामुळे महामंडळाचे ९ कोटी ६१ लाख रुपयांचे नुकसान (transport minister pratap sarnaik) यांनी आज विधानसभेत दिली.
यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (sunil Prabhu)आणि आमदार शंकर जगताप (Shankar Jagtap.)यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सरनाईक यांनी ही माहिती दिली.
संबंधित जागेवर एस. टी महामंडळाच्या नियोजन आणि पणन विभागाच्या प्रस्तावानुसार एसटी बस स्थानकातील होर्डिंगवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी टेकसिद्धी अॅडव्हर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस २३ मार्च, २०२४ ते २२ फेब्रुवारी, २०२९ या कालावधीसाठी जीएसटी वगळून १२ कोटी २२ लाख २० हजार रुपये वार्षिक देणे बंधनकारक करुन परवाना देण्यात आला होता.परंतु सदर ठेकेदार कंपनीने कराराचे पालन न करता मे २०२४ ते डिसेंबर २०२४ मध्ये मासिक परवाना भाडे न दिल्याने महामंडळाचे ९ कोटी ६१ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. थकबाकीचे समान हप्ते करुन थकबाकी सव्याज वसुलीबाबतची कार्यवाही सुरु आहे. याशिवाय कंपनीला देण्यात आलेले डिजिटल जाहिरातीचे अधिकार काढून घेतले आहेत, असे सरनाईक यांनी सांगितले.

Web Title:
संबंधित बातम्या