छत्रपती संभाजीनगर -छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर (Vaijapur)तालुक्यातील आश्रमात घुसून महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई महाराज (Sangeetatai Maharaj)यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आता दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
२७ जूनच्या रात्री संगीताताई महाराज यांची हत्या (murder)झाली होती. २८ जून रोजी सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला. पोलिसांनी एका आरोपीला वैजापूर तालुक्यातून ताब्यात घेतले, तर दुसऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशात धाड टाकली. हे दोन्ही आरोपी (Both accused) पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, या अटकेपूर्वी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी केली होती.