पत्नी, मुलीला दरमहा ४ लाख दे!मोहम्मद शमीला कोर्टाचे आदेश

Give ₹4 lakh per month to wife and daughter: Court orders Mohammed Shami

Give ₹4 lakh per month to wife and daughter: Court orders Mohammed Shami

कोलकाता – भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला(Mohammed Shami) कौटुंबिक वादात कोलकाता उच्च न्यायालयाने(High court) देखभाल खर्च म्हणून पत्नीला दरमहा दीड लाख रुपये तर मुलीला अडीच लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने( Court Order) दिले आहेत.
शमीची पत्नी हसीन जहाँ (Alimony to Wife)हिच्या तक्रारीवरून शमीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा(domes) खटला दाखल आहे. नुकतीच या याचिकेवर न्या. अजय कुमार मुखर्जी यांच्या न्यायासनासमोर सुनावणी झाली. त्याप्रसंगी न्यायालयाने हे आदेश दिले.(Cricketer Dispute)
या प्रकरणी २०१८ अलीपूर सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालात पत्नी हसीन जहाँला दरमहा ५० हजार तर मुलीला ८० हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. मात्र या निर्णयाला हसीन जहाँने उच्च न्यायालयात आव्हान देत स्वतःसाठी दरमहा ७ लाख रुपये आणि मुलीसाठी ३ लाख रुपये भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. शमीचे मासिक उत्पन्न ६० लाख रुपये असून पत्नी आणि मुलीचा दर महिन्याचा खर्च ६ लाख रुपयांहून जास्त आहे,असा युक्तिवाद हसीन जहाँच्या वकिलांनी केला होता.