२९५ कोटींचे कर्ज बुडवले ! ड्युप्लेक्स कंपनीवर गुन्हा

Duppliex company booked for defaulting on ₹295 crore loan

Duppliex company booked for defaulting on ₹295 crore loan


मुंबई – २९५.१५ कोटी(295 Crore Scam) रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी (Loan Fraud )अंमलबजावणी संचलनालयाने (ED) पुणे स्थित ड्युप्लेक्स इंडस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी(Duppliex Company ) आणि तिच्या संचालकाविरूध्द मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे.(Bank Scam)
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय)नेतृत्वाखालील बँकांच्या कन्सोर्टियमने ड्युप्लेक्स इंडस्ट्रिजला हे कर्ज दिले होते. या प्रकरणी ईडीने कंपनीचे संचालक अनिल सातपुते आणि कांचन सातपुते यांच्यासह गिरीश डोंगरे, अक्षय इन्सुलेटेड , आदित्य जोशी, एच जी मेहता अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि पंकज सेठ यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या सर्व आरोपींना ईडीने तपासादरम्यान अटक केलेली नाही. हे सर्व आरोपी अटकपूर्व जामिनावर आहेत.(Loan Default Case)
ड्युप्लेक्सच्या संचालकांनी बनावट कंपन्यांशी निर्यात व्यवहार केल्याची खोटी बिले दाखवून एसबीआय आणि कन्सोर्टियममधील अन्य बँकांकडून मोठ्या रकमेची कर्जे मिळवून त्या पैशाचा अपहार केला. थकवलेली ही रक्कम २९९.२४ कोटी रुपये आहे. कंपनीने ४.०९ कोटींचे तारण एसबीआयकडे ठेवले आहे.

Share:

More Posts