Home / राजकीय / विधानसभेतील इंग्रजी कामकाज पत्रिकेवर मुनगंटीवरांचा आक्षेप

विधानसभेतील इंग्रजी कामकाज पत्रिकेवर मुनगंटीवरांचा आक्षेप

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप आमदार (BJP MLA) आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी...

By: Team Navakal
Mungantivara objects to the English proceedings paper in the Legislative Assembly

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप आमदार (BJP MLA) आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी कामकाजाच्या पत्रिका इंग्रजीतून देण्यावर आक्षेप घेतला. औचित्याचा मुद्दा मांडताना मुनगंटीवार यांनी विधानसभेत इंग्रजीचा (English language) वापर वाढत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, १९९५ पासून मी सभागृहात आहे, पण आजवर कार्यक्रम पत्रिका इंग्रजीत पाहिल्याचे आठवत नाही. महाराष्ट्र विधानसभा नियमांनुसार कामकाज मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत होऊ शकतं, मात्र आपण इंग्रजीला जबरदस्तीने प्राधान्य देतोय, हे योग्य नाही.

यावर सभागृहातील काही सदस्यांनी हे आधीपासूनच चालत आले आहे अशी प्रतिक्रिया दिली असता, मुनगंटीवारांनी त्यांना सुनावत म्हटले की, पहिल्यापासून आहे म्हणजे काय? सनदी अधिकाऱ्यांना आपण मराठी शिकायला लावतो. इकडे मराठी अभिजात भाषा करायची आणि मराठी ज्यांना बोलता येत नाही, त्यांना हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी वापरायला सांगायची. मग हिंदीत बोलावे. कार्यक्रमपत्रिका हिंदीत घ्यावी. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करायचा आणि इंग्रजीवर प्रेम दाखवायचे. इंग्रजीला आलिंगन द्यायचे. याला माझा आक्षेप आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम तयार करताना इंग्रजीचा प्रभाव असेल. माझी नम्र विनंती आहे की एकदा नियम समितीची बैठक बोलवावी आणि विधीमंडळाच्या कामकाजात जिथे जिथे इंग्रजी शब्दांचा वापर झाला आहे, तो पूर्णपणे काढून टाकावा. मराठी ही आमची अभिजात भाषा आहे आणि ती शिकलीच पाहिजे. अत्यंत गरज भासल्यास, पर्यायी भाषा म्हणून हिंदीचा वापर होऊ शकतो. पण कोणाला इंग्रजीशिवाय काहीच समजत नसेल, तर अशा व्यक्तींनी पासपोर्ट आणि व्हिसा काढून थेट ब्रिटनच्या संसदेत जावे.

Web Title:
संबंधित बातम्या