पोर्श अपघात खटला लांबवण्याचा आरोपींचा प्रयत्न ! सरकारचा युक्तिवाद

Attempt by the accused to delay trial in Porsche accident case

Attempt by the accused to delay trial in Porsche accident case

पुणे – पुणे, कल्याणीनगर(kalyaninagar) येथे गेल्या वर्षी घडलेल्या पोर्श कार (porsche car accident)अपघात प्रकरणी क्षुल्लक मुद्दयांवर अर्ज दाखल करून खटल्याचे कामकाज लांबवण्याचा प्रयत्न आरोपींकडून केला जात आहे,असा युक्तिवाद सरकार पक्षाच्या वकिलांनी केला.
गेल्या वर्षी मे महिन्यात पहाटेच्या सुमारास पोर्श कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीने दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील एक महिला आणि एका पुरुषाचा गाडीखाली चिरडून जागीच मृत्यू झाला होता.हे दोघे आयटी अभियंता होते.या प्रकरणी मुख्य आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याच्यावर बाल न्याय मंडळात खटला चालू आहे.तर अपघातानंतर ससून हॉस्पिटलमध्ये त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्याप्रकरणी डॉक्टर आणि आरोपीचे आई-वडील आणि आजोबा असे एकूण दहा आरोपी आहेत.
सध्या पुणे जिल्हा न्यायालयात आरोपींवर आरोप निश्चित करण्यासाठी सुनावणी सुरू आहे. काल सरकार पक्षाने आपला युक्तिवाद पूर्ण करताना डीएनए चाचणीत(DNA test) आरोपीच्या रक्ताच्या(blood test) नमुन्याऐवजी आरोपीच्या आईच्या रक्ताचा नमुना देण्यात आला हे सिध्द झाले असल्याने दहाही आरोपींवर आरोप निश्चित करण्याची विनंती न्यायालयाला केली.

त्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवादाला सुरुवात करणे आवश्यक होते. मात्र आरोपींनी आपल्याला आरोपपत्राची प्रत देण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात सादर केला. त्यावर आक्षेप घेत आरोपपत्राची प्रत आधीच दिली गेली आहे. हा अर्ज केवळ खटल्याची सुनावणी लांबवण्याच्या(Attempt by the accused to delay tria) हेतूने करण्यात आला आहे, असा युक्तिवाद सरकार पक्षाच्या वकिलांनी केला.