Home / News / सोनम रघुवंशीचे पिंडदान करून वाराणशीत महिलांनी निषेध नोंदवला

सोनम रघुवंशीचे पिंडदान करून वाराणशीत महिलांनी निषेध नोंदवला

लखनौ – पती राजा रघुवंशी यांच्या हत्येचा आरोप असलेली पत्नी सोनम रघुवंशीचा (SONAM RAGHUVANSHI) जिवंतपणी पिंडदान विधी करून वाराणशीतील महिला...

By: Team Navakal
somnath raghuvanshi


लखनौ – पती राजा रघुवंशी यांच्या हत्येचा आरोप असलेली पत्नी सोनम रघुवंशीचा (SONAM RAGHUVANSHI) जिवंतपणी पिंडदान विधी करून वाराणशीतील महिला संघटनांनी अनोख्या पध्दतीने तिच्या राक्षसी कृत्याचा निषेध नोंदवला.
हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या गंगा नदी (Ganga)किनारी असलेल्या ऐतिहासिक दशाश्वमेध घाटावर महिला संघटनांनी सोनम रघुवंशीच्या छायाचित्राला फुलांचा हार घालून तिचे विधिवत पिंडदान (Pind Daan)केले.मात्र विधी आटोपल्यानंतर सोनमचे छायाचित्राचे त्यांनी गंगेत विसर्जन केले नाही.तिला मोक्ष लाभू नये म्हणून आम्ही विसर्जन विधी केला नाही, असे महिलांनी सांगितले.

सोनमच्या पाशवी कृत्याने केवळ राजा रघुवंशी (Raja Raghuvanshi) नामक एका व्यक्तीचा बळी गेला नसून समस्त स्त्रियांच्या चारित्र्य़ावर प्रश्नचिन्ह लागले आहे. विवाह संस्थेवरील विश्वास डळमळीत करणारे अत्यंत नीच आणि निंदनीय कृत्य सोनमने केले आहे.तिने स्त्रित्वाचा घोर अपमान केला आहे. म्हणून ती जिवंत असताना आम्ही तिचे पिंडदान केले,अशी संतप्त प्रतिक्रिया या पिंडदान विधीला उपस्थित असलेल्या महिलांनी दिली.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या