Home / देश-विदेश / रियो तात्सुकीचे भाकीत अंशत: खरे! जपानमध्ये भूकंपाचे धक्के

रियो तात्सुकीचे भाकीत अंशत: खरे! जपानमध्ये भूकंपाचे धक्के

टोकियो – जपानचे प्रसिद्ध मंगा कलाकार रियो तात्सुकी (Ryo Tatsuki) यांनी जपान (Japan) बद्दल ५ जुलै २०२५ बाबत केलेले भाकीत...

By: Team Navakal
Earthquake tremors in Japan

टोकियो – जपानचे प्रसिद्ध मंगा कलाकार रियो तात्सुकी (Ryo Tatsuki) यांनी जपान (Japan) बद्दल ५ जुलै २०२५ बाबत केलेले भाकीत अंशत: खरे झाले आहे. जपानच्या कागोशिमा (Kagoshima) प्रांतात काल भूकंपाचे धक्के बसले. टी याची तीव्रता ५.४ रिक्टर स्केलवर नोंदवली गेली. या भूकंपाचे केंद्र जमिनीच्या १० किलोमीटर खाली होते. काल झालेल्या भूकंपामुळे जपानमध्ये पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीची (Natural disaster) भीती निर्माण झाली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.


रियो तात्सुकी यांनी कॉमिक द फ्यूचर आय सॉ (Comic The Future I Saw) या मंगा पुस्तकात, पुस्तकाच्या २०२१ च्या आवृत्ती मध्ये त्यांनी ५ जुलै २०२५ रोजी जपानमध्ये मोठी नैसर्गिक आपत्ती येईल आणि जपान संपूर्ण नष्ट होईल अशी भविष्यवाणी केली होती. विशेष म्हणजे, तात्सुकी यांची १९९५ च्या कोबे भूकंप आणि २०११ च्या तोहोकू सुनामीसाठीची भविष्यवाणीही खरी ठरली होती. गेल्या महिनाभरापासून याची सर्वत्र चर्चा होती. जरी भूकंपाची भविष्यवाणी जरी सत्य ठरली असली तरी, या भूकंपामुळे जपानच्या आर्थिक आणि भौगोलिक संरचनेला कुठलेही मोठे नुकसान झालेले नाही. त्याचबरोबर कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तरीही, सध्याच्या परिस्थितीमुळे जपानमध्ये लोक प्रवास रद्द करत आहेत आणि भविष्यात होणाऱ्या आणखी नैसर्गिक आपत्तींविषयी गहिरा विचार करत आहेत.


याआधी, कागोशिमा प्रांताच्या टोकारा बेट समूहात गेल्या दोन आठवड्यांत १००० पेक्षा जास्त भूकंपाचे धक्के आले आहेत. गुरुवारी ३ जुलैला आलेल्या भूकंपाने जनजीवन विस्कळीत केले झाले होते . यामुळे जपान सरकारने बेटांवर राहणाऱ्या लोकांसाठी तातडीच्या सूचनाही जारी केल्या आहेत.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या