पुण्यात परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यास नकार

Pune non-local woman refuses to speak in Marathi.

कॅबचालकाशी वादाचा व्हिडिओ व्हायरल;Pune non-local woman refuses to speak in Marathi.

पुणे– महाराष्ट्रात सक्तीच्या हिंदी आणि मराठी भाषेच्या वादाच्या (Pune language controversy)पार्श्वभूमीवर पुण्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक परप्रांतीय महिला कॅबचालकाशी वाद घालताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कॅबचालक महिलेला मराठीत बोलण्यास सांगतो, परंतु ती महिला त्याच्यावर जोरात ओरडून म्हणते की, मी तुमच्यापेक्षा महाराष्ट्र सरकारला जास्त कर देते, त्यामुळे मी मराठीत बोलणार नाही.(Marathi language dispute)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Pune viral video language)झाला आहे. कॅबचालक महिलेला मराठीत बोलण्याची विनंती करतो . कारण महाराष्ट्रात काम करत असताना तिला मराठीत संवाद साधावा लागेल. परंतु, महिला त्याच्यावर ओरडून म्हणते की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे त्यामुळे मी फक्त हिंदीत बोलेन. मी मराठी बोलणार नाही, मराठी बोलणे अनिवार्य नाही. आम्ही (हिंदी भाषिक लोक) काळा पैसा कमवत नाही. आम्ही कायदेशीरपणे पैसे कमवतो आणि सरकारला पूर्ण कर देतो, त्यानंतर कॅबचालक शांतपणे आपली कॅब घेऊन निघून जातो.