Home / देश-विदेश / मध्यप्रदेशात लाडक्या बहिणींना आता १२५० ऐवजी १५०० रुपये! मुख्यमंत्र्यांची घोषणा

मध्यप्रदेशात लाडक्या बहिणींना आता १२५० ऐवजी १५०० रुपये! मुख्यमंत्र्यांची घोषणा

भोपाळ- मध्यप्रदेशातील भाजप सरकार आता आपल्या संकल्प पत्रानुसार दिवाळीपासून लाडक्या बहिणींना १२५० ऐवजी दरमहा १५०० रुपये देणार आहे.मुख्यमंत्री डॉ. मोहन...

By: Team Navakal

भोपाळ- मध्यप्रदेशातील भाजप सरकार आता आपल्या संकल्प पत्रानुसार दिवाळीपासून लाडक्या बहिणींना १२५० ऐवजी दरमहा १५०० रुपये देणार आहे.मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या वाढीव भेटीची घोषणा केली आहे.दुसरीकडे या खर्चामुळे कोटींच्या कर्जात बुडालेल्या सरकारचे आर्थिक व्यवस्थापन आणखी बिघडणार असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव म्हणाले की, भाजपाने त्यांच्या संकल्प पत्रात ३००० रुपये देण्याची घोषणा केली होती.आम्ही ही घोषणा पूर्ण करणार आहोत. ही योजना सुरुवातीला दरमहिना १ हजार रुपयांपासून सुरू झाली होती. नंतर आम्ही ती १२५० रुपये केली मात्र, दिवाळीपासून आम्ही १५०० रुपये देणार आहोत. लाडक्या बहिणींनाआता १५०० रुपये मिळणाऱ्या असल्याने राज्यावर दरमहा सुमारे ३१० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.त्यामुळे वार्षिक खर्च २२,००० कोटी रुपयांच्या पुढे जाणार आहे. ही योजना २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या सुरुवातीला १.२९ कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला.ऑक्टोबर २०२३ मध्ये ही संख्या १.३१ कोटींवर पोहोचली.आता ही संख्या १.२७ कोटी आहे.सध्या योजनेत नवीन नावे जोडली जात नाहीत.वय आणि इतर अटींच्या आधारे अनेक नावे काढून टाकली जात आहेत.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या